Saturday, May 4, 2024
Homeनगरभरधाव ट्रकने चिरडले; महिला जागीच ठार, एक गंभीर

भरधाव ट्रकने चिरडले; महिला जागीच ठार, एक गंभीर

वैजापूर | प्रतिनिधी

ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडल्याची घटना शहरातील भाजी मंडई समोर येवला रोड येथे सकाळी ८ वजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतीक्षा राजेंद्र चौधरी (वय ४०, राहणार संभाजीनगर कॉलनी वैजापूर) या आपल्या सासऱ्यांसोबत दुचाकीवरून (क्र.एम.एच.20आयडी8312) येवला रोडने भाजी मंडईला जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र.एम.एच.२०एचबी ८३१२) त्यांच्या दुचाकीला धडक दिली देत चिरडून पसार झाला. या अपघातात प्रतीक्षा चौधरी या जागीच ठार झाल्या असून त्यांचे सासरे हे गंभीर रित्या जखमी झाले आहे.

नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करत चांडगव येथील गणेश राहणे यांच्या मदतीने येवला तालुक्यातील गवंडगाव येथे पसार झालेला ट्रक पकडून पोलिसांना कळविले. अपघात झाल्यानंतर जवळपास ४५ मिनिटे अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्याकरिता रुग्णवाहिका मिळली नाही, शेवटी ४५ मिनिटांच्या प्रदीर्घ वेळानंतर रुग्णवाहिकेत जखमींना उपचाराकरिता वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रस्त्यावर फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे रोज अपघात

भाजी मंडई परिसरात फळ विक्रेत्यांच्या हात गाड्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन रोज अपघात होत आहेत. यात फळविक्रेते रस्त्याच्या कडेला आपली हातगाडी न लावता रस्त्याच्या मधोमध उभी करून मनमानी कारभार करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या