Saturday, June 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजन्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ

न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ

मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्यासाठी गठीत केलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी शासन निर्णय जारी केला.

मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेतील आवश्यक पुराव्यांची वैधानिक तसेच प्रशासकीय तपासणी करून पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार या समितीला सरकारने वारंवार मुदतवाढ दिली.

निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीची मुदत ३० जून २०२६ पर्यंत होती. मात्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने समितीचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समितीची मुदत १ जुलै २०२६ पासून ३० जून २०२७ पर्यंत वाढवण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार, समितीच्या कामकाजासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांना दरमहा चार लाख रुपये मानधन मंजूर करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वरला अमृतकुंडाच्या तळाशी शिवपिंडीचे दर्शन; पुरातत्त्व विभागाच्या स्वच्छता मोहिमेत उलगडले दुर्मिळ...

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरातील ऐतिहासिक अमृतकुंडाची भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत स्वच्छता करण्यात आल्यानंतर कुंडाच्या तळाशी असलेल्या शिवपिंडीचे दर्शन घडले....