Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्याकांदा मागणी वाढणार; कृषीतज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांचा अंदाज

कांदा मागणी वाढणार; कृषीतज्ञ डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांचा अंदाज

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

सध्या कांद्याला भाव (onion price) कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतात उत्तरेत होणारे कांदा उत्पादन! (Onion production) पावसाळ्यात टिकाऊ कांद्यास म्हणजे उन्हाळ कांद्यास (summer onion) तेथे मागणी वाढेल.

कारण तेथे साठवणुकीच्या सुविधा नाहीत. शेजारच्या देशांची आर्थिक परिस्थिती गेल्या वर्षी कोलमडली होती. आता ती सुधारत आहे. त्यामुळे कांदा निर्यातीस (Onion export) मागणी वाढत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतीय कांद्याची गुणवत्ता चांगली व स्वस्त आहे. या सर्व गोष्टी विचारात घेता येत्या ऑगस्टनंतर कांद्याच्या मागणीत मोठे बदल दिसतील. कांद्याची मागणी वाढल्यावर दरातही सुधारणा होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय कीड-रोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी ‘देशदूत’शी बोलताना वर्तवला आहे.

भारतात कांद्याच्या किमती (onion price) प्रामुख्याने हंगामातील फरक, हवामान, मागणी, पुरवठा, सरकारी धोरणे यांसारख्या विविध कारणांमुळे चढउतार आदी घटकांवर अवलंबून असतात. गेल्या काही वर्षांतील कांदा भावाची आकडेवारी पाहा कांद्याच्या किमती पावसाळ्यात (rain) वाढतात आणि हिवाळ्यात कमी होतात, असे दिसून येते. मार्च 2023 मधील परिस्थितीबद्दल हा मुद्दा सध्या शेतकर्‍यांचा (farmers) कळीचा मुद्दा दिसतो. चालू वर्षी कांदा भावाबाबत काही प्रमुख घटनाक्रम बोलके आहेत.

या वर्षी उशिरा कांदा लागवड झाली. कांदा बियाण्याला विशेष मागणी नव्हती. हिवाळ्यात भाव पडल्याने उशिराच्या (लेट) कांद्याकडे शेतकर्‍यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे उत्पादन घटले. साठवणूकक्षम व टिकाऊ कांद्याचे प्रमाण खूपच कमी आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal rain) कांद्याचे भरपूर नुकसान झाले आहे. पाऊस कमी पडण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांकडून वारंवार येत आहेत. तेही कांदा उत्पादक (Onion grower) शेतकर्‍यांनी लक्षात घ्यावेत, असे डॉ. वाघचौरे यांनी सांगितले.

कांद्याच्या किमती मागील वर्षातील त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा लक्षणीय घसरल्या आहेत. तथापि, बाजारातील मागणी व पुरवठा परिस्थितीनुसार किमतीत पुन्हा चढ-उतार होऊ शकतात, असेही डॉ. वाघचौरे यांनी सांगितले.

परिस्थितीनुरूप कांदा साठवण करा

भारतातील कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांत केंद्रित आहे. मध्य प्रदेशात चालू वर्षी गव्हाचे उत्पादन क्षेत्र वाढले. परिणामी कांदा लागवड क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे यंदा सलग 3 रे वर्षे कांदा पीक जुगार ठरणार का? ते येणारा काळच ठरवेल. सप्टेंबर 2021 मधील एका अहवालानुसार येत्या काही महिन्यांत भारतातील कांदा उत्पादन वाढण्याची अपेक्षा होती. प्रतिकूल हवामान, लागवड क्षेत्र व नुकसान आदी परिस्थितीचा विचार करून शेतकर्‍यांनी कांदा साठवणुकीसंदर्भात निर्णय घ्यावा, असे डॉ. ज्ञानेश्‍वर वाघचौरे यांनी सुचवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या