नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
31 मार्च पर्यंत कांद्याचे अनुदान (Onion Grant) शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची सरकारची वल्गना जुलै महिना अर्ध्यावर सरला तरी प्रत्यक्षात उतरण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याने नेवासा (Newasa) तालुक्यातील शेतकर्यांत असंतोष खदखदत असून याप्रकरणी राज्य सरकारकडून तारीख पे तारीख दिली जात असल्याचा निषेध (Protest) व्यक्त होत आहे.
दुचाकी अपघातात जवानासह सोनेवाडीतील तरुणाचा मृत्यू
बाजारात कांद्याचे (Onion) भाव प्रचंड घसरले. मातीमोल भावाने कांदा (Onion) विकला जाऊ लागला. शेतकर्यांचा रोष कमी करण्यासाठी शासनाने कांदा उत्पादक शेतकर्यांना प्रती क्विंटल 350 रुपयांचे तुटपुंजे अनुदान (Grant) जाहीर केले असले तरी ते प्रत्यक्षात शेतकर्यांच्या पदरात पडण्याचा मुहूर्त गवसला नाही. 31 मार्च पूर्वी कांदा उत्पादक (Onion Grower) शेतकर्यांच्या खात्यावर सदरचे अनुदान वर्ग होण्याचा वायदा उलटून जाऊन मोठा कालावधी लोटला गेला आहे. त्यानंतरही सरकारकडून अनेक तारखा जाहीर होऊनही त्याची प्रत्यक्षात अंमल बजावणी कधी होणार याची शेतकरी आतुरतेने वाट पाहताना दिसत आहे.
सरकारकडून कांद्याचे अनुदान आज येईल, उद्या येईल असे करता करता मोठा कालावधी उलटून गेला आहे. कांद्यासाठी काढलेल्या कर्जाच्या परताव्यासाठी तगाद्यांनी जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. परंतु शासनाचे अनुदानासाठी ‘तारीख पे तारीख’ सुरूच आहे. हा प्रकार म्हणजे ‘लबाडा घरचे आवतनं…’ या प्रकारातील असल्याचे आमचे ठाम मत बनले असल्याची प्रतिक्रिया जळके खुर्द येथील कांदा उत्पादक शेतकरी दादासाहेब चिमणे यांनी व्यक्त केली असून सर्व कांदा उत्पादक (Onion Grower) शेतकरीही असाच असंतोष व्यक्त करताना दिसत आहेत.
वैद्यकीय व्यावसायिकासह चौघांना रॉड, दांडक्याने मारहाणनिळवंडेत 2500 दलघफू पाणी