बांगलादेशच्या अंतरिम सरकारने कांद्याच्या वाढत्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा आयातीस परवानगी दिली आहे. कृषी मंत्रालयाचे वरिष्ठ माहिती अधिकारी मोहम्मद जाकिर हुसेन यांनी सांगितले की ७ डिसेंबरपासून दररोज ५० आयात परवाने दिले जातील आणि प्रत्येक परवान्यात जास्तीत जास्त ३० टन कांदा आयात करण्याची मुभा असेल.
फक्त ऑगस्टपासून आतापर्यंत एक्सपोर्ट परमिटसाठी अर्ज केलेले आयातदार यासाठी पात्र असतील आणि प्रत्येकाला एकदाच अर्ज करता येईल. किंमती स्थिर होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
- Advertisement -
या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि नाशिकमधील निर्यातदारांना पुन्हा बांगलादेशात कांदा पाठवण्याची संधी मिळणार आहे. गेल्या काही आठवड्यांतील वाढत्या किंमतीमुळे सरकारवर दबाव वाढला होता.




