Monday, May 27, 2024
Homeनगरकांद्याच्या दरात उसळी

कांद्याच्या दरात उसळी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मागणी वाढली असून आवक कमी झाल्याने उन्हाळी नंबर 1 नंबर कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. काल गुरूवारी झालेल्या लिलावात संगमनेर बाजार समिती आवारात कांद्याला 500 ते 6011 रुपयांचा तर सोलापुरात 7000 प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे. गत आठवड्याच्या तुलनेत 700 ते 900 रूपयांचा जादा दर मिळाला. बाजारभाव वाढल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असलातरी मोजक्या शेतकर्‍यांकडेच कांदा शिल्लक आहे.

- Advertisement -

नाशिक आणि नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. पण यंदा पाऊस कमी झाल्याने या जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात कांद्याची लागवड झाली आहे. त्यात ऑक्टोबर हिटमुळे बराचसा कांदा खराब झाला आहे. आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात पावसामुळे कांद्याचे पीक घेण्यात महिनाभराचा उशीर झाला आहे. त्यामुळेही कांद्याचे भाव वाढत आहेत.

काही दिवसांपूर्वी कांद्याला अगदीच कमी भाव मिळत होता. कांदा 7 ते 8 रुपये किलोने बाजारात खरेदी करण्यात येत होता. मात्र, आता घाऊक बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकर्‍यांना देखील दिलासा मिळत आहे.

संगमनेर बाजार समिती आवारात 2011 गोणी कांद्याची आवक झाली. 1 नंबर कांद्याला 6011 रूपयांचा दर मिळाला. श्रीरामपुरात 156 साधनांची आवक होऊन कांद्याला दर 4300 ते 5560 रूपयांचा दर मिळाला. कोपरगावात 2500 ते 5701 रूपयांचा भाव मिळाला. वैजापूर बाजार समितीत 1000 ते 5500 रूपयांचा दर मिळाला. कोल्हापूर, चाकणलाही 4000 रूपयांचा दर मिळाल. वांबोरीत 2595 गोणी कांद्याची आवक झाली. त्यात 1000-5500 रूपयांचा दर निघाला. लासलगाव-विंचूर येथे 10600 गोणी कांद्याची आवक झाली. या कांद्याला 3000 ते 5100 रूपयांचा दर होता. कोल्हापपुरात 2000 ते 6300 दर मिळाला. सोलापुरात कांद्याला उच्चांकी दर मिळाला. येथे 3874 गोणी कांद्याची आवक झाली. या कांद्याला 2000 ते 7000 रूपयांचा दर मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या