श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
गत आठ दिवसांपासून कांद्याच्या दरात कमालीची तेजी आली आहे. विशेष म्हणजे कांद्याला राज्यात सर्वाधिक भाव नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मिळात आहे. काल रविवारी राहाता बाजार समिती आवारात क्विंटलमागे 1 नंबरच्या कांद्याला 3300 रूपयांचा भाव मिळाला आहे.त्या खालोखाल पारनेरात कांद्याला 3100 चा भाव मिळाला आहे.
शुक्रवारी पारनेर बाजार समिती आवारात 23976 गोणी उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. त्यात 300 ते 3500 रूपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळाला. पण काल कांद्याची आवक 23976 गोणीपर्यंत वाढल्याने भाव 300 ते 3100 रूपये पर्यंत भाव मिळाला. राहाता बाजार समिती आवारात नंबर एक उन्हाळ कांद्याला 700 ते 3300 रूपयांचा भाव मिळाला. वैजापुरात कांद्याला 300 ते 3000 रूपयांचा दर मिळाला. कोपरगावात 350 ते 2350 रूपयांचा दर मिळाला.
टोमॅटोच्या दरात घट
गेल्या महिनाभरापासून तेजीत असलेल्या टोमॅटोची आवक वाढल्याने घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात घट झाली. नवीन लागवड केलेला टोमॅटोची आवक बाजारात सुरू झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोची आवक दुपटीने वाढली आहे. घाऊक बाजारात दहा किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार 1000 ते 8000 रुपये असे दर मिळाले आहेत. गत दहा दिवसांपूर्वी हेच भाव 4000 ते 14000 हजार रूपये असा दर होता. राहुरीत टोमॅटो 1000 ते 8000 रूपये, राहात्यात 2000 ते 5000 रूपयांचा दर मिळाला.