Wednesday, December 4, 2024
Homeनगरकांद्याच्या दरात वाढ सुरूच

कांद्याच्या दरात वाढ सुरूच

राहात्यात 3400, दौंडमध्ये 3600 रुपये

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गत सहा महिन्यांनंतर कांद्याच्या दरात वाढ होत आहे. काल रविवारी झालेल्या लिलावात राहाता बाजार समितीत नंबर एक कांद्याला क्विंटलमागे 3400 रुपयांचा दर मिळाला. राज्यात सर्वाधिक भाव दौंड-केडगाव येथे 3600 रुपयांचा दर मिळाला. अकोलेत 3000 रुपये, पारनेरात 3300 रुपयांचा दर मिळाला. या दरवाढीमुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिंळाला आहे तर गृहिंणींचे बजेट कोसळणार आहे.

- Advertisement -

मध्यंतरी वाढत्या उष्म्याने कहर केला होता. त्यात शेतकर्‍यांचा कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला त्यामुळे ही भाववाढ होत असल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले. निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळले होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. त्यात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ही निर्यातबंदी उठविल्याच्या घोषणेनंतर दरात काहीशी सुधारणा झाली होती. एप्रिल-मे महिन्यात वाढत्या तापमानाने कहर केला होता. यात कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या