Saturday, May 4, 2024
Homeनाशिकपिंपळगाव बाजार समितीत गुजरातचा कांदा

पिंपळगाव बाजार समितीत गुजरातचा कांदा

पिंपळगाव ब.। वार्ताहर | Pimpalgaon Baswant

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जवळपास 300 ते 400 वाहनांमधून बाजार समितीत (Market Committee) लाल कांद्याची (red onion) आवक होते. परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक (Onion grower) शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

दुबार कांदा लागवडीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असून त्यामुळे लागवड झालेला कांदा उशिरा बाजारपेठेत दाखल होणार आहे. त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटली असून दरवर्षीप्रमाणे इंडोनेशिया (Indonesia), कतार (Qatar), मलेशिया (Malaysia) आदी ठिकाणी लाल कांद्याला (red onion) मागणी असल्याने पिंपळगावच्या व्यापार्‍यांनी गुजरात (gujrat), राजस्थान (rajasthan) साऊथमधून मोठ्या प्रमाणात मागवलेला लाल कांदा दाखल झाला असून हा कांदा इंडोनेशिया, कतार, मलेशिया आदी ठिकाणी पाठवला जाणार आहे.

सध्या बाजार समितीत लाल कांद्याला 1500 ते 3400 रुपयांपर्यंत भाव मिळत असून हा कांदा अत्यल्प दाखल झाला आहे. तर उन्हाळ कांंदादेखील 650 ते 1400 रु. प्रतिक्विंटलने विकला जात आहे. आजचा भाव बघता कांदा पिकावर (onion crop) झालेला खर्चही फिटणे अवघड झाले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी (farmers) कर्जबाजारी होताना दिसू लागला आहे. कांद्याचे भाव कोसळत असतानाही दरवर्षीच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे.

व्यापार्‍यांनी यापूर्वीच परदेशात कांदापुरवठ्याचे नियोजन केले होते. मात्र त्या तुलनेत बाजारात कांदा येत नसल्याने येथील व्यापार्‍यांना नाईलाजास्तव शेजारच्या राज्यातून कांदा आयात करून नोंदवलेली मागणी पूर्ण करून द्यावी लागत आहे. आपल्याकडील कांदा किमान दीड महिना तरी उशिराने विक्रीसाठी दाखल होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या