Saturday, May 4, 2024
Homeनगरकांद्याला पुन्हा तेजी: दर साडेपाच हजारांवर

कांद्याला पुन्हा तेजी: दर साडेपाच हजारांवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्यानंतर काही काळ दराबाबत स्थिर असलेल्या कांद्याने घाऊक बाजारात पुन्हा उसळी घेतली आहे.

- Advertisement -

शनिवारच्या तुलनेत कांदा दरात सरासरी वाढ होत काल सोमवारी नगरच्या बाजार समितीत (दि. 12) झालेल्या कांदा लिलावात गावरान कांद्याला विक्रमी 5 हजार 500 रुपयांचा भाव मिळाला.

तसेच सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 4100 रुपये प्रतिक्विंटल तर कमाल 4552 रुपये भाव मिळाला. पुण्यात 4500 तर सोलापुरात सर्वाधिक 6000 रुपयांचा भाव मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून 4 हजारापर्यंत खाली आलेला गावरान कांदा शनिवारच्या लिलावात 4 हजार 500 रुपयापर्यंत गेला होता. कालच्या लिलावात त्यात तब्बल 1 हजार रुपयांची भरघोस वाढ झाली असून कांदा 5 हजार 500 पर्यंत पोहोचला.

मागील 21 सप्टेंबरला झालेल्या लिलावात कांद्याला विक्रमी 5 हजार 200 रुपये प्रतीक्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर 22 दिवसांनी आता कांद्याला त्यापेक्षा जास्त म्हणजे 5 हजार 500 रुपयांचा भाव निघाला आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या लिलावात गावरान कांद्याची 18 हजार 355 क्विंटल, तर लाल कांद्याची 900 क्विंटल आवक झाली.

* नगर- गावरान कांदा (भाव)

– प्रथम प्रतवारी 4 हजार 500 ते 5 हजार 500

– द्वितीय 3 हजार ते 4 हजार 500

– तृतीय 1 हजार 700 ते 3 हजार

– चतुर्थ 700 ते 1 हजार 700

* लाल कांदा (भाव)

– प्रथम प्रतवारी 2 हजार 800 ते 3 हजार 500

– द्वितीय 1 हजार 700 ते 2 हजार 800

– तृतीय 800 ते 1 हजार 700

– चतुर्थ 400 ते 800

- Advertisment -

ताज्या बातम्या