अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील विविध बाजार समित्यांच्या आवारात नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात काल गुरूवारी 94 हजारांपेक्षा अधिक कांद्याची आवक झाली. पण भावात घसरण झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. अहिल्यानगर बाजार समिती आवारात 66919 क्विंटल कांद्याची आवक झाली. 400 ते 3000 रूपयांचा दर मिळाला. वांबोरीत 7224 क्विंटल आवक झाली.
दर 200 ते 2800 रूपये मिळाला. संगमनेरात 12184 क्विंटल कांद्याची आवक झाली. दर 500 ते 2811 रूपये विकला गेला जामखेडमध्ये 5281 क्विंटल कांद्याची आवक झाली. दर 100 ते 3100 रूपये मिळाला. शेवगावात 2600 क्विंटल कांद्याची आवक झाली. दर 340 ते 2800 रुपये मिळाला. गत पंधरा-वीस दिवसांपूर्वी 5500 रूपयांचा दर मिळत होता. पण आता कांद्याच्या दरात घसरण झाली असून हा दर 3000 रूपयांपर्यंत खाली आला आहे. दिवसागणीक कांदयाचे दर कमी होत असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.