Saturday, July 27, 2024
Homeनगरकांदा रस्त्यावर ओतून चांद्यात निषेध

कांदा रस्त्यावर ओतून चांद्यात निषेध

चांदा |वार्ताहर| Chanda

सध्या कवडीमोल दराने विकला जात असलेल्या कांद्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणले असून कपाशीपाठोपाठ कांद्याचाही वांदा झाल्याने नेवासा तालुक्यातील चांदा येथील युवा शेतकर्‍यांनी रस्त्यावर कांदा ओतून निषेध व्यक्त केला.

- Advertisement -

सध्या बाजारपेठेत कांदा अगदी कवडीमोल दराने विकला जात आहे. एक एकर कांदा लावल्यापासून काढणीपर्यंत जवळपास 50 हजारांपर्यंत खर्च लागत आहे. मात्र सध्या बाजारात कांद्याचा दर प्रतिकिलो दोन-तीन रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही निघेना. कापूस भावाने हैराण झालेल्या बळीराजाला आता कांद्यानेही रडविले आहे. त्यामुळे कांद्याला हमीभाव मिळावा, कापसाचे कमी झालेले दर वाढवावे, वीज बिलाची झालेली दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी चांदा व परीसरातील युवा शेतकर्‍यांनी चांदा बस स्टँडजवळ एकत्र येत आणलेला कांदा रस्त्यावर फेकून घोषणा देत अभिनव आंदोलन केले.

यावेळी भारत राष्ट्र समितीचे ओंकार बडाख, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब दहातोंडे, सादिक शेख, बाळासाहेब चौधरी, सुजित हजारे, प्रशांत दहातोंडे, सतीश पुंड, आदिनाथ बागवाले, सचिन ससाणे, सागर पाचोरे, नितीन दहातोंडे, दीपक दहातोंडे, प्रसाद दरवडे, फिरोज शेख, महेश दहातोंडे, सचिन जावळे, भूषण दहातोंडे, प्रणव दहातोंडे, अशोक दहातोंडे, अमित गवळी आदींसह चांदा आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या