Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रबारावीच्या परीक्षेसाठी ‘या’ तारखेपासून ऑनलाईन अर्ज

बारावीच्या परीक्षेसाठी ‘या’ तारखेपासून ऑनलाईन अर्ज

पुणे –

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने 2021 घेण्यात येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेसाठीचे Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE)

- Advertisement -

अर्ज भरण्यास येत्या 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ुुु.ारहरहीीललेरीव.ळप या संकेतस्थळावर भरायचे आहेत.

राज्यात करोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. तसेच वेळोवेळी कालावधी वाढवल्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणापत्र परीक्षा मार्च 2020 परीक्षांचे निकाल जुलै 2020 मध्ये जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 घेण्यात येणार्‍या बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत सरल डेटाबेसवरून 15 डिसेंबर 2020 पासून 4 जानेवारी 2021 पर्यंत भरायची आहेत. तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी 5 ते 18 जानेवारी 2021 दरम्यान ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.

विद्यार्थ्यांचे अर्ज भरल्यानंतर त्यांना कॉलेज लॉगीनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिली जाईल. प्री-लिस्टवरील माहिती आणि जनरल रजिस्टरमधील माहिती विद्यार्थ्यांनी पडताळून पाहून खात्री करून अर्ज निश्चित करायचा आहे. बारावी परीक्षेची अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच अर्ज भरावे, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

नव्याने फॉर्म क्रमांक 17 भरणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक

नव्याने फॉर्म क्रमांक 17 द्वारे नोंदणी करणार्‍या खासगी विद्यार्थ्यांची 2021 मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपर्ण निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या कालावधीत या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यात येऊ नयेत, असेही राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्ज भरण्याच्या तारखा

नियमित विद्यार्थी – 15 डिसेंबर 2020 ते 4 जानेवारी 2021

व्यवसाय अभ्यासक्रमचे नियमित विद्यार्थी, पुनर्परिक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार विद्यार्थी – 5 ते 18 जानेवारी 2021

- Advertisment -

ताज्या बातम्या