Saturday, September 14, 2024
HomeनाशिकNashik Crime News : तरुणाची अडीच लाखांची ऑनलाईन फसवणूक

Nashik Crime News : तरुणाची अडीच लाखांची ऑनलाईन फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

ऑनलाईन पार्टटाईम जॉबच्या बहाण्याने एका तरुणाची तब्बल २ लाख ७६ हजारांची फसवणूक (Fraud) झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber ​​Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

Nashik News : ब्रिटिशकालीन सावळ-पोवळया घाटातील रस्त्याची मोजणी

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर घटनेप्रकरणी अभिषेक रामप्रसाद अग्रहरी (वय २८, रा. मोती सुपर मार्केट, पेठ रोड, पंचवटी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. ते खासगी नोकरी करत असून ते वेगवेगळ्या ऑनलाईन साईटवर (online site) पार्टटाईम जॉबच्या शोधात होते. त्यावेळी अज्ञात इसमाने टेलिग्राम आयडी यावरून त्यांच्याशी चॅटिंग करून ऑनलाईन पार्टटाईम जॉब करण्याचा बहाणा केला. त्यावर अग्रहरी यांचा विश्वास बसला.

Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी मांडली राज्य सरकारची भूमिका, म्हणाले…

त्यानंतर संशयितांनी एक लिंक पाठविली. त्या लिंकवर एअर तिकीट बुकिंग करण्याचा बनावट टास्क देऊन फिर्यादी अग्रहरी यांना पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँकेच्या खाते क्रमांकावर एकूण २ लाख ७६ हजार ८९७ रुपये भरण्यास लावून अग्रहरी यांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार दि. ४ ते ८ सप्टेंबर दरम्यान घडला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कादवाचा गळीत हंगाम शुभारंभ उद्या

- Advertisment -

ताज्या बातम्या