Thursday, May 15, 2025
Homeधुळेअ‍ॅप डाऊनलोड करीत ओटीपीही सांगितला अन्‌ क्षणात नऊ लाख झाले गायब

अ‍ॅप डाऊनलोड करीत ओटीपीही सांगितला अन्‌ क्षणात नऊ लाख झाले गायब

धुळे – प्रतिनिधी dhule

- Advertisement -

अ‍ॅप (app) डाऊनलोड करून ओटीपीही (otp) सांगितल्याचे शिरूड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Primary Health Centre) कर्मचार्‍याला चांगले महागात पडले. त्यांच्या बँक खात्यातून परस्पर 9 लाख काढून त्यांची फसवूणक करण्यात आली.

याप्रकरणी आकाश वर्मा नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गोळीबार टेकडी, वैभव नगरातील स्वामी अपार्टमेंटमध्ये प्रभाकर हिंमतराव पाटील (वय 58) हे राहतात. ते शिरूड प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी असून त्यांना दि.28 रोजी त्यांच्या के्रडीट कार्डचे 5 हजार 829 रूपये रिफंडबाबत त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर 9387284988 क्रमांकावरून फोन आला.

त्याबाबत त्यांना संपुर्ण माहिती सांगून पाटील यांच्याकडे त्याचे बॅँक खाते, पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड व्हॉट्स अ‍ॅपवर मागविले. त्यानंतर मोबाईल नंबर विचारून त्यात कस्टमर सपार्ट एनी डीक्स स्लाईस हे अ‍ॅप ओपन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवून दि.30 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता प्रभाकर पाटील यांनी त्या मोबाईल क्रमांकावर फोन केला. तेव्हा समोरील आकाश वर्मा नामक इसमाने ते डाऊनलोड केलेले अ‍ॅप ओपन करण्यास सांगितले.

त्यानंतर संपुर्ण माहिती विचारून मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला. त्यानंतर मात्र पाटील यांच्या स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या बँक खात्यातून तब्बल 8 लाख 99 हजार 10 रूपये परस्पर ट्रान्सफर करून घेवून त्यांची फसवणूक केली. पुढील तपास सायबर पोलिस (police) ठाण्याचे पीआय सतिष गोराडे हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या