Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रडॉक्टरास ५० हजाराचा ऑनलाईन गंडा

डॉक्टरास ५० हजाराचा ऑनलाईन गंडा

पुणे

पेटीम मधून बोलत असल्याचे सांगून आणि केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगत पुण्यातील हिंजवडी भागातील एका उच्चशिक्षित डॉक्टरांना एका अज्ञात व्यक्तीने ५० हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी डॉ.मिलिंद शरद गावडे (वय ५७ वर्षे, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिसात तक्रार दिली आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुंह दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. मिलिंद शरद गावडे यांच्या खासगी मोबाईल क्रमांकावर अज्ञात आरोपीने मोबाईल क्रमांक ७४७८८६८२८८ वरून फोन करत मी पेटीएममधुन बोलत आहे, असे सांगून गावडे यांचा विश्वास संपादन केला आणि केवायसी अपडेट करण्यास सांगितले. परंतु, ते अपडेट न झाल्याने गावडे यांना अज्ञात आरोपीने एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर ते फिर्यादी यांनी डाऊनलोड केले. तेव्हा, त्याद्वारे ५० हजार आरोपीने स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून उच्च शिक्षित डॉक्टरची फसवणूक केली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Manikrao Kokate : “…तर जनतेचा पैसा खर्च होईल”; मंत्री कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती...

0
नाशिक | Nashik महायुती सरकारमधील (Mahayuti Government) राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयाने...