Saturday, July 27, 2024
Homeधुळेहस्ती गृप ऑफ स्कूलतर्फे विद्यार्थ्यांना सापांविषयी ऑनलाईन मार्गदर्शन

हस्ती गृप ऑफ स्कूलतर्फे विद्यार्थ्यांना सापांविषयी ऑनलाईन मार्गदर्शन

दोंडाईचा Dondaicha । वि.प्र.

हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट Hasti Charitable Trust संचलीत, हस्ती गृप ऑफ स्कूलतर्फे Hasti Group of Schools नागपंचमीनिमित्त Nagpanchami सापांविषयी माहिती Information about snakes देण्याचा उपक्रम ऑनलाइन व्हर्च्युअल क्लासेस Online virtual classes द्वारा आयोजित करण्यात आला होता.

- Advertisement -

याप्रसंगी शालेय समिती चेअरमन कैलास जैन, स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी तसेच प्राचार्य हरिकृष्ण निगम आणि पालक सौ. नम्रता लखोटिया व डॉ. प्रविण गोस्वामी हे व्हर्च्युअली उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका सुवर्णा पाटील यांनी केले. यानंतर हस्ती लिओ क्लब – एंजल्स सदस्या विद्यार्थिनी कल्याणी पाटील, दिव्या लखोटिया, सिमरन अग्रवाल, जान्हवी पवार यांनी एकाक्ष नाग, मण्यार, फुरसे, घोणस, खापर खवल्या, गवत्या साप, जाळीदार अजगर अशा विविध विषारी व बिनविषारी सर्प प्रजातींविषयी अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. सोबतच डॉ. प्रविण गोस्वामी यांनी सापांविषयी असलेले समज व गैरसमज तसेच अंधश्रद्धा या बाबींवर प्रकाशझोत टाकला.

हा कार्यक्रमात हस्ती पब्लिक स्कूल, हस्ती वर्ल्ड स्कूल व हस्ती गुरूकुल शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक अजित मन्सुरी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या