Saturday, July 27, 2024
Homeनगरऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयातील नोंदी लाभ घेण्याचे नेवासा तहसीलदारांचे आवाहन

ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयातील नोंदी लाभ घेण्याचे नेवासा तहसीलदारांचे आवाहन

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

कोणत्याही खातेदाराला-संबंधीत व्यक्तीला सातबारा संबंधात वेगवेगळया हक्काच्या नोंदी तलाठी कार्यालयात समक्ष न जाता ऑनलाईन पध्दतीने करता येणार असून त्यासाठी खातेदारांनी नवीन ऑनलाईन आज्ञावलीचा वापर करावा असे आवाहन नेवाशाचे तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी केले आहे.

- Advertisement -

याबाबत पत्रकात त्यांनी म्हटले की, महसुल विभागाच्या जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने ई-हक्क (पब्लिक डाटा एन्ट्री) नावाने नवीन ऑनलाईन आज्ञावली विकसीत करण्यात आलेली आहे. सदर आज्ञावलीचा वापर करुन कोणत्याही खातेदाराला/संबंधीत व्यक्तीला सातबारा संबंधात वेगवेगळया हक्काच्या नोंदी तलाठी कार्यालयात समक्ष न जाता ऑनलाईन पध्दतीने करता येतील.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात वारस नोंद, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, ईकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, विश्वस्ताचे नाव कमी करणे, संगणकीकृत 7/12 मधील चुक दुरुस्त करणे, एकत्र कुटुंब कर्ता कमी करणे असे नऊ प्रकारचे फेरफार घेण्यासाठी ई-हक्क प्रणालीतून ऑनलाईन पध्दतीने करता येणार.

सदर प्रणालीचा वापर करण्यासाठी ‘पीडीईआयजीआर डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेस्थळाचा वापर करुन त्यामध्ये ‘क्रिएट न्यू युजर’ अकाऊंटमध्ये जाऊन नवीन युजर आयडी व पासवर्ड तयार करावा. त्यानंतर ‘युजर लॉगिन’ वर जाऊन प्रवेश पटलातून प्रवेश करावा व नवीन अर्ज हा पर्याय वापरुन नवीन अर्ज निवडावा त्यानंतर वर नमुद नऊ प्रकारापैकी योग्य तो फेरफारचा प्रकार निवडावा व अर्ज भरुन साठवा करावा. आपला अर्ज ऑनलाईन पध्दतीने तलाठी कार्यालयाला प्राप्त होईल. व त्यांनतर तलाठी पुढील कार्यवाही करतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या