Monday, May 5, 2025
Homeधुळेजिल्ह्यात केवळ 18 हजार हेक्टरवर पेरणी

जिल्ह्यात केवळ 18 हजार हेक्टरवर पेरणी

धुळे dhule । प्रतिनिधी

जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला (rabbi’s sowing) आता वेग आला आहे. पंरतू गेल्या महिन्यापासून पेरण्या सुरू होऊन देखील केवळ 18 हजार 866 हेक्टर क्षेत्रावर (field) पेरणी (Planted)झाली आहे. त्याची टक्केवारी (percentage) केवळ 20.93 टक्के आहे. त्यात सर्वांत जास्त पेरणी साक्री तर सर्वांत कमी पेरणी शिरपूर तालुक्यात झाली आहे. हरभरा आणि गहू (gram and wheat) या पिकांची सर्वाधिक लागवड झाली असल्याची माहिती कृषी विभागाकडून (Department of Agriculture) देण्यात आली.

- Advertisement -

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. अती पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यातही कापूस आणि मका क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतरही शेतकर्‍यांनी रब्बीची तयारी सुरू केली. दरम्यान अतीवृष्टीमुळे सर्वच तलाव, धरण, विहिरी यांचा चांगल्याप्रकारे पाणी आलेले आहे. त्याचा फायदा रब्बी हंगामाला होत आहे.

दरम्यान, यंदा सुमारे 90 हजार 124 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी कृषी विभागाने प्रस्तावित केलेली आहे. दिवाळीनंतर जिल्ह्यात रब्बी पेरणीला सुरूवात झाली. यंदा रब्बीचे क्षेत्र वाढेल असा अंदाज होता. मात्र, तसे झालेले नाही तसेच गेल्या तीन आठवड्यात पेरणीला पाहिजे तसा वेग आलेला नाही. जिल्ह्यात 90 हजार 124 पैकी 18 हजार 866 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी अवघी 20.93 टक्के आहे.

जिल्हयात साक्री तालुक्याचे रब्बीचे क्षेत्र 20 हजार 738 एवढे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. यापैकी आतापर्यंत 6 हजार 311 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झालेली असून, त्याची टक्केवारी 30.43 एवढी आहे. तर शिंदखेडा तालुक्याचे रब्बीच्या 32 हजार 178 क्षेत्रापैकी 7 हजार 695 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून, त्याची टक्केवारी 23.91 एवढी आहे. धुळे तालुक्यात 17 हजार 500 पैकी 3 हजार 487 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून, त्याची टक्केवारी 19.32 एवढी आहे. या तालुक्यात गव्हाचे क्षेत्रे जास्त आहे.

दरम्यान सर्वांत कमी शिरपूर तालुक्यात पेरणी झाली आहे. शिरपूर तालुक्यात रब्बीचे 19 हजार 708 हेक्टर पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यापैकी फक्त 1 हजार 373 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून, त्याची टक्केवारी 6.96 एवढी आहे. रब्बीच्या पेरणीमध्ये हरभरा आणि गहू या पिकांची सर्वाधिक लागवड करण्यात आलेली अहे. जिल्ह्यात हरभर्‍याचे 26 हजार 66 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, त्यापैकी 8हजार 195 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तर गव्हाचे 44 हजार 83 हेक्टर प्रस्तावित असून, त्यापैकी 4 हजार 181 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. याशिवाय मक्याची लागवड 1923 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.

खतांचा पुरवठा पुरेसा

जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत रब्बीची पेरणी करण्यात येते आता पेरणीसाठी जवळपास 40 दिवसांचा कालावधी बाकी असून, या उर्वरित दिवसांत 80 टक्के पेरणी पूर्ण होते की नाही याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेला खतांचा पुरवठा पुरेसा प्रमाणात होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : SRH vs DC – आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (सोमवारी) हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad vs...