Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्यापावसाची ओढ; जिल्ह्यात ३३ टक्केच पाणीसाठा

पावसाची ओढ; जिल्ह्यात ३३ टक्केच पाणीसाठा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात दोन -तीन दिवसांपासून पावसाने काहीशी हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ३३ टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर पोहचला आहे. मागील वर्षी १७ जुलै रोजी जिल्ह्यातील धरणांतील साठा ८० टक्के इतका होता, तर यंदा याच दिवसापर्यंत पाण्याची पातळी ४७  टक्क्यांनी कमी असून सद्य परिस्थितीत जिल्ह्यातील धरणांत  33 टक्के इतकाच पाणीसाठा आहे….

जिल्ह्यात मोठे प्रकल्प सात तर मध्यम प्रकल्प १७ असे एकूण २४ प्रकल्प आहेत.या सर्व प्रकल्प मिळून २१,६६६ दशलक्ष घनफुट म्हणजेच ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक  आहे.आजअखेर मागील वर्षी ८० टक्क्यांवर असलेला जलसाठा यावर्षी ३३ टक्के इतकाच असून तो ४७ टक्क्यांनी कमी झाला आहे.

जून महिना कोरडा गेल्याने जुलै महिन्यात पावसाची प्रतीक्षा होती.त्यानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात गंगापूरसह जिल्ह्यातील  काही धरण क्षेत्रात थोडाफार  पाऊस झाल्याने धरणातील पाणी पातळीत  वाढ झाल्याने नाशिक शहरावरील पाणी कपातीचे  संकट तूर्त टळले आहे. मागील आठवड्याच्या जलसाठ्यात थोडीशी  वाढ झाली. त्यामुळे गंगापूर धरणामध्ये सद्यस्थितीत 40 टक्के इतका पाणीसाठा आहे गतवर्षी तोच 62 टक्के इतका होता. गंगापूर धरण समूहाचा विचार करता सद्यस्थितीत 30 टक्के पाणीसाठा असून गतवर्षी तो बहात्तर टक्के 17 जुलै अखेर होता.

गतवर्षी 17 जुलै अखेर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी होते त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरण साठ्यांमध्ये 80 टक्के इतका पाणीसाठा होता मात्र यावर्षी आज अखेर धरणांतील पाणीसाठा हा 33%₹ टक्के  इतकाच आहे. त्यामुळे जिल्हावासीय विशेषता पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत कायम आहे. गंगापूर धरणात सध्या ४० टक्के इतका जलसाठा असला तरी समूहाचा साठा ३० टक्के इतकाच आहे. मागील वर्षी आज अखेर समूहाचा साठा ७२  टक्के इतका होता.

Nashik News : मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळली; दोघे गंभीर जखमी

अल्प पाऊस चिंता वाढवणारा

नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अल्प असल्याने ते चिंता वाढविणारे आहे हवामान विभागाने आता पावसाचा जोर वाढेल. असा अंदाज वर्तवला आहे.पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी कपातीची वेळ येणार नाही.नाशिककरांवर अद्यापही पाणी कपातीचे संकट नसले तरी अत्यल्प पाऊस चिंता वाढवणारा  आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक जलसाठा सद्यस्थितीत नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पात ६१ टक्के इतका असून तो गेल्या काही दिवसानंतर काहीसा कमी झाला आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत जलसाठा

गंगापूर ४०  टक्के, कश्यपी २२  टक्के, गौतमी गोदावरी ११७ टक्के, पालखेड ३५ टक्के, करंजवण २३  टक्के, वाघाड १६ टक्के, ओझरखेड २५ टक्के, पुणेगाव १८ टक्के , दारणा ६०  टक्के, भावली ६५  टक्के, मुकणे 5 टक्के, वालदेवी 22 टक्के, कडवा 29 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 61% भोजापूर ११ टक्के चणकापूर 45 टक्के, हरणबारी 57 टक्के, केळझर 46 टक्के, नागासाक्या निरंक, गिरणा 19 टक्के, पुनद 47 टक्के असा एकूण 33 टक्के पाणीसाठा जिल्ह्यातील वरील धरणांमध्ये आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Trimbakeshwar News : सोमवती अमावस्यानिमित्त त्र्यंबकनगरी भाविकांच्या गर्दीने फुलली

- Advertisment -

ताज्या बातम्या