Saturday, July 27, 2024
Homeनगरभंडारदरात अवघा 9 टक्के पाणीसाठा

भंडारदरात अवघा 9 टक्के पाणीसाठा

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणात यंदा केवळ 9 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच काळात जवळपास 53 टक्के पाणीसाठा होता. या ना त्या कारणाने पाणलोटात मान्सून उशीरा दाखल झाला तर येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना अडचणीत येणार आहेत. गतवर्षी भंडारदरा पाणलोटात पाऊस कमी झाला. पण निम्म्याच्या वर पाणीसाठा असल्याने कसेबसे हे धरण ओव्हरफ्लो झाले होते. पण यंदा लाभक्षेत्रात मागणी जादा असल्याने आवर्तनात पाणी खर्ची झाले. त्यात ‘समन्यायी’मुळे भंडारदरा-निळवंडेतून पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले. त्यामुळे आता हे धरण खपाटीला गेले आहे.

- Advertisement -

अलीकडच्या काळात अशी भीषण परिस्थिती नव्हती. काल या धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. 11019 दलघफू क्षमतेच्या या धरणात सध्या केवळ 1048 दलघफू (9.49टक्के) साठा आहे. हवामान खात्याचा अंदाज आणि पाणलोटात काजव्यांचे झालेले आगमन यामुळे यंदा मान्सून पाणलोटात लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. पण तसे न झाल्यास उत्तर नगर जिल्ह्यापुढे पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निळवंडेतही पाणीसाठा अत्यल्प आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या