Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्ह्यात कोरोनाचे केवळ पाच रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे केवळ पाच रुग्ण

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान 13 बाधित रुग्णांची कोरोनावर मात केली असून 14 तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही.

- Advertisement -

जिल्ह्यात रविवारी नवीन आढळून आलेल्या बाधितांमध्ये जामनेर 02, चाळीसगाव 03 असे एकूण 5 रुग्ण आढळून आले आहेत. तर जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, यावल, एरंडोल, रावेर, पारोळा, मुक्ताईनगर, बोदवड या 14 तालुक्यांमध्ये रविवारी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधिताची संख्या 1 लाख 42 हजार 516 एवढी झाली आहे. दुसरीकडे 13 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 1 लाख 39 हजार 828 एवढ्या रुग्णांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 575 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 113 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या