Wednesday, May 22, 2024
Homeनंदुरबारअडीच महिन्यात फक्त दहा दिवस पावसाची हजेरी

अडीच महिन्यात फक्त दहा दिवस पावसाची हजेरी

शहादा Śahādā।

यावर्षी खान्देशवर रुसलेल्या पावसाने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. तालुक्यातही हीच परिस्थिती आहे. अडीच महिन्यात अवघ्या दहा दिवस Only ten days of rain in a month तेही उशिराने हजेरी लावलेल्या पावसामुळे तालुक्यात कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणी होऊन 86 हजार 651 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी Kharif sowing झाली खरी. परंतु ऐन श्रावणात श्रावण सरींऐवजी भाद्रपदाप्रमाणे कडक ऊन पडत असल्याने Kovali crops अखेरचा श्वास घेत आहेत. त्यातही उत्पन्नाची हमखास हमी देणार्‍या पपई व ऊसावर विविध रोगांनी शिरकाव केल्याने शेतकरी Farmers पुरता हवालदिल झाला आहे. पावसाला अजून उशीर झाला तर खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांना सतावत आहे. या अस्मानी संकटातून दिलासा मिळण्यासाठी सर्वांच्याच नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत.

- Advertisement -

यंदा जुलै महिन्यात पावसाचे आगमन झाले. त्यात पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता तरीही काही शेतकर्‍यांनी आज ना उद्या बरसेल या आशेवर पेरणीची सुरुवात केली होती. तद्नंतर पावसाने ओढ दिल्याने पेरणी वाया गेली. ऑगस्टमध्ये बरसलेल्या पावसावर सर्वत्र पेरणी झाली. पेरणीनंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने कोवळी पिके तीव्र उन्हामुळे अखेरची घटका मोजत आहेत. दोन-चार दिवस कडक ऊन पडल्यास खरीप हंगामाच वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

गेल्या वर्षी कोरोना, यंदा दुष्काळी परिस्थिती

गेल्यावर्षी कोरोनामुळे उत्पादित मालाला भाव नव्हता. त्यामुळे उत्पादन खर्च निघणे ही अवघड झाले होते. शेतात उत्पादित झालेला माल लॉकडाऊनमुळे गल्लोगल्ली कवडीमोल दराने विकावा लागला. परिणामी उत्पादन खर्च अधिक झाल्याने खर्चही निघाला नाही. यंदा वरूणराजा चांगला बरसेल, गेल्या वर्षीची झळ यंदा भरून निघेल या आशेवर शेतकर्‍यांनी कर्ज तर काहींनी उधार उसनवार करून बी बियाणे खरेदी केले. बियाण्याची पेरणीही झाली. परंतु पाऊस नसल्याने पुरता खरीपच वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.

पपई, ऊसावर रोगाचा प्रादुर्भाव

दरम्यान, बागायतदार शेतकर्‍यांनी ऊस व पपईची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उसावर पायरिया तर पपईवर विविध विषाणूजन्य आजारांनी शिरकाव केल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे. कापसावर काही ठिकाणी लाल्या आल्याने कापसाचे क्षेत्र लाल होत आहे. कोवळ्या पिकांना काही शेतकरी चुवा पध्दतीने पाणी घालून पिके जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. त्याचबरोबर इतर पिकेही पावसाअभावी अखेरची घटका मोजत असल्याने शेतकर्‍यांवर आर्थिक संकट घोंगावत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या