Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशधक्कादायक! Open AI वर गंभीर आरोप करणाऱ्या भारतीय संशोधक सुचिर बालाजीचा फ्लॅटमध्ये...

धक्कादायक! Open AI वर गंभीर आरोप करणाऱ्या भारतीय संशोधक सुचिर बालाजीचा फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

मुंबई | Mumbai
ChatGPT विकसित करणारी अग्रगण्य आर्टिफिशल इंटेलिजन्स कंपनी OpenAIचा २६ वर्षीय माजी संशोधक सुचिर बालाजी सॅन फ्रान्सिस्को फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला आहे. २६ वर्षीय बालाजीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. २६ नोव्हेंबर रोजी बुकानन स्ट्रीटवरील त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता. सुचीर याने नुकतेच ओपनएआयच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तो मृतअवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

२६ वर्षीय सुचिरचा मृत्यू आत्महत्या असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत. तसेच घातपात झाल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ओपनएआय बरोबर चार वर्ष काम केल्यानंतर सुचिर बालाजी याने ऑगस्ट महिन्यात कंपनी सोडली होती. बालाजी याने नोव्हेंबर २०२० ते ऑगस्ट २०२४ पर्यंत OpenAI सोबत काम केले.

- Advertisement -

सुचिर बालाजी बरेच दिवसांपासून घराबाहेर पडला नव्हता. आणि तो त्यांच्या मित्र आणि सहकाऱ्यांच्या फोन कॉललाही उत्तर देत नव्हता. सुचीरचे मित्र आणि सहकारी त्याच्या फ्लॅटवर पोहोचले असता त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी सॅन फ्रान्सिस्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सुचीर बालाजी याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात कुठलाही गैरप्रकार झाल्याचे पुरावे मिळालेले नसून, ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा संशय आहे.

सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकलने पोलिसांच्या निवेदनाचा हवाला देत म्हटले आहे की, ‘पोलीस अधिकारी वैद्यकीय पथकासह फ्लॅटवर पोहोचले. त्यांना सुचिर बालाजी मृत आढळले. प्राथमिक तपासात चुकीचा कोणताही पुरावा आढळून आला नसून हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयाच्या संचालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘सूचीर यांनी आत्महत्या केली आहे.

Open AI कडून बालाजीच्या मृत्यूला दुजोरा
ओपन एआय कंपनीने सुचिर बालाजी याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही दुःखद बातमी ऐकून आम्हाला धक्का बसला आहे आणि आम्ही या कठीण काळात सुचीर यांच्या प्रियजनांप्रती शोक व्यक्त करतो.

सुचिर बालाजीने Open AI मधून राजीनामा का दिला?
अमेरिकेतील एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, सूचिर बालाजी यांनी आरोप केला होता की ,Open AI च्या पद्धती इंटरनेट इकोसिस्टम आणि व्यवसाय आणि लोकांसाठी हानिकारक आहेत. ज्यांचा डेटा कंपनी त्यांच्या संमतीशिवाय वापरत आहे. अनेक लेखक, प्रोग्रामर आणि पत्रकारांनी OpenAI विरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांमध्ये सुचीर बालाजीचे आरोप केंद्रस्थानी आहेत. या लोकांनी दावा केला आहे की OpenAI ने त्यांच्या कॉपीराइट केलेल्या कामांचा ChatGPT प्रशिक्षित करण्यासाठी बेकायदेशीरपणे वापर केला आहे.

कोण आहे सुचिर बालाजी
कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवीधर असलेल्या बालाजीने आपल्या महाविद्यालयीन काळात OpenAI आणि Scale AI मध्ये इंटर्नशिप केली होती. 2019 मध्ये तो OpenAI मध्ये नोकरी करु लागला. कंपनीत त्याने चार वर्षे काम केले. या कालावधीत, GPT-4 चे प्रशिक्षण आणि ChatGPT ची कामगिरी सुधारण्यासह अनेक प्रकल्पांवर त्याने काम करत महत्वाची भूमिका बजावली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...