नाशिक | Nashik
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे (ICC ODI World Cup) आयोजन भारतात करण्यात येणार आहे.ही स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. स्पर्धेचा हा तेरावा हंगाम असणार आहे. स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण ४८ सामने होणार आहेत. सर्व सामने ५० षटकांचे होणार आहेत.२९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत १० सराव सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे….
४ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे आहे. भारतातील सर्व बॉलीवूड कलाकार हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे. स्पर्धेच्या १० संघांचे कर्णधार उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
१० संघांच्या सर्व करणधारांपैकी ४ कर्णधार स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत. इतर सर्व कर्णधार सराव सामने आटोपून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे अहमदाबाद येथे रवाना होणार आहेत.या उद्घाटन सोहळ्यात आयसीसीचे सर्व सदस्य, जागतिक क्रिकेट प्रशासकीय मंडळाच्या कार्यकारी मंडळांचे सदस तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सर्व प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे सर्व सामने मुंबई, पुणे,कोलकाता, अहमदाबाद, धर्मशाला, हैदराबाद,नवी दिल्ली, चेन्नई, बंगळूर,लखनौ,सराव सामन्याचे आयोजन हैदराबाद, गुवाहाटी,तिरूअनंतपुरम येथे होणार आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
सर्व १० संघाचे कर्णधार असे
भारत: रोहित शर्मा पाकिस्तान: बाबर आझम, ऑस्ट्रेलिया पेट कमिन्स, दक्षिण आफ्रिका: टेंबा बाऊमा, न्यूझीलंड: केन विलियमसन किंवा टोम लेथम, नेदरलँड्स: एस एडवर्डस, इंग्लंड जोस बटलर, अफगाणिस्तान: हशमतुललाह शाहिदी श्रीलंका : दसून शनाका, बांगलादेश शाकिब अल हसन