Thursday, May 15, 2025
Homeदेश विदेशOperation Keller: जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त; तीन दहशतवाद्यांचा...

Operation Keller: जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-कश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात भारतीय सैन्याने मंगळवारी ‘ऑपरेशन केलर’ अंतर्गत लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा यंत्रणांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. १३ मे रोजी शोपियानातील केलर इथल्या जंगलात सुरक्षा दलाने ही कारवाई केली होती. या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रे, ग्रेनेड, काडतुसे, बॅगपॅक आणि दहशतवाद्यांचे ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

LoC वरील गोळीबार बंद होताच सैन्य दलांनी जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांविरोधात जोरदार शोधमोहिम राबवली. त्यात मंगळवारी सकाळी शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक उडाली. यात लश्कर-ए-तोयबाचा कमांडर शाहीद कुट्टे आणि अदनान शफीसह ३ दहशतवादी मारले गेले. यातील तिसरा दहशतवादी अहसान-उल-हक शेख हा पुलवामातील रहिवासी आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा, हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्यात एके ४७, मॅगजीन, ग्रेनेड आणि अन्य शस्त्रांचा समावेश आहे.

भारतीय सैन्याने एका अधिकृत पोस्टमध्ये सांगितले की, ऑपरेशन केलर-१३ मे २०२५ रोजी राष्ट्रीय रायफल्स युनिटने दिलेल्या दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारावर भारतीय सैन्याने शोध आणि नष्ट करण्याची मोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. ज्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आणि तीन कट्टर दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.

ही कारवाई भारतीय सैन्य, जम्मू-कश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि गुप्तचर संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये टॉपचा लष्कर कमांडर शाहिद कुट्टे याचाही समावेश आहे. तो शोपियातील चोटीपोरा येथील रहिवासी होता. मार्च २०२३ साली तो लश्कर ए तोयबात सहभागी झाला होता. तो लश्कराचा प्रमुख दहशतवादी होता. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात होता. ८ एप्रिल २०२४ साली दानिश रिसोर्टवर झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता. या दहशतवादी हल्ल्यात जर्मनीचे २ पर्यटक आणि १ वाहनचालक जखमी झाला होता. १८ मे २०२४ साली हिरपोरामध्ये भाजपा सरपंचाची हत्या करण्यात त्याचा कट होता. इतर दोघांपैकी एकाची ओळख अदनान शफी म्हणून झाली आहे. तर तिसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...