Friday, May 3, 2024
Homeनगरऑपरेशन मुस्कान : 539 जणांचा शोध

ऑपरेशन मुस्कान : 539 जणांचा शोध

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar – जिल्हा पोलीस दलाच्यावतीने 1 ते 30 जून दरम्यान जिल्हाभर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कानअंतर्गत 539 जणांचा शोध घेण्यात आला. यामध्ये 61 अल्पवयीन मुले, 299 महिला, 138 पुरूष तसेच रेकॉर्डव्यतिरिक्त पाच बालकांचा समावेश आहे.

पोलीस दलाकडून महिनाभर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुुस्कानअंतर्गत अपहरण झालेल्या लहान मुलांचा, तसेच बेपत्ता झालेल्या महिला व पुरूषांचा शोध घेण्यात आला. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक पथक तयार करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये 133 अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी 60 गुन्ह्यातील 61 मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले असून, यात 51 मुली, तर 10 मुलांचा समावेश आहे. दोन हजार 72 प्रौढ व्यक्ती हरवल्याची नोंद आहे. यातील 299 महिला, तर 138 पुरूषांना शोधण्यात आले आहे. तसेच रेकॉर्डव्यतिरिक्त दोन सज्ञान व्यक्ती व पाच बालकांचा शोध घेण्यात आला.

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कानचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक मसूद खान, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील पोलीस कर्मचारी सोमनाथ कांबळे, अर्चना काळे, अनिता पवार, रिना म्हस्के, मोनाली घुटे, छाया रांधवन, रूपाली लोहाळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी ही कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या