Saturday, July 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजऑपरेशन ‘शोध-३’ मोहीम : सहा वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचाही लागला शोध; दिंडोरी...

ऑपरेशन ‘शोध-३’ मोहीम : सहा वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचाही लागला शोध; दिंडोरी पोलिसांचे यश

दिंडोरी / ओझे | प्रतिनिधी Dindori – Oze

- Advertisement -

दिंडोरी पोलीस ठाण्याने राबवलेल्या ऑपरेशन ‘शोध-३’ मोहिमेत अवघ्या नऊ दिवसांत १४ बेपत्ता महिला व मुलींचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. या महिलांना शोधून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या आदेशानुसार तसेच कळवण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २०१५ पासून बेपत्ता झालेल्या महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले. सपोनि सोपान राखोंडे, हवालदार विश्वनाथ काकड, हवालदार सोनाली कराड व शिपाई प्रकाश गायकवाड यांच्या पथकाने ६ मार्च २०२६ पासून शोधमोहीम सुरू करून एकूण २६ बेपत्ता महिलांपैकी १४ महिलांचा शोध लावला.

यामध्ये २०२० मधील एक, २०२१ मधील एक, २०२३ मधील तीन, २०२४ मधील तीन, २०२५ मधील चार आणि २०२६ मधील दोन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे २०२० पासून सुमारे सहा वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचाही शोध लावण्यात यश आले. दरम्यान, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत लॉजिंग सह अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली असून शाळा-कॉलेज व बसस्थानक परिसरात टवाळखोरांवर कारवाई करत गस्त वाढवली आहे.

तसेच लॉज चालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शहरात बेशिस्त वाहन पार्किंगवरही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिंडोरी पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : घोडेगावातील कांद्याचा वाचा भाव

0
नेवासा | Newasa येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) शनिवारी कांद्याची 55 हजार 373 गोण्या आवक झाली. भाव 2700 रुपयांपर्यंत...