Wednesday, May 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजOperation Sindoor : अखेर भारताने बदला घेतलाच; पाकिस्तानात घुसून केले दहशतवादी अड्डे...

Operation Sindoor : अखेर भारताने बदला घेतलाच; पाकिस्तानात घुसून केले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानला चोख प्रत्यतुत्तर दिले जावे अशी मागणी सातत्याने होत होती.

- Advertisement -

यानंतर अखेर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना उद्धवस्त केले. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते. भारताने मध्यरात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. तिन्ही सैन्य दलाचे जॉइंट ऑपरेशन होतं. पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ॲापरेशन मॅानिटर करत होते.यावेळी 9 टार्गेट ठेवण्यात आले होते. यामध्ये 9 च्या 9 टार्गेट यशस्वी झाले आहेत. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. भारताने केलेल्या हल्ल्यावेळी बहावलपूरमध्ये 200 हून अधिक दहशतवादी होते, अशी माहिती मिळत आहे. तर मुरिदकेमध्ये 120 हून अधिक दहशतवादी, मुजफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी, कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी, सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी, गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी, भिंबरमध्ये 60 हून अधिक दहशतवादी, चाक अम्रूमध्ये 70 ते 80 दहशतवादी होते, अशी माहिती सांगितली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ मे २०२५ – सुसंवादाला पर्याय नाही

0
समाजमाध्यमे आणि ओटीटी व्यासपीठावरून सादर होणार्‍या अश्लील सादरीकरणाने सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडल्या आहेत अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. त्याला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलावीत...