Saturday, May 17, 2025
Homeदेश विदेशOperation Sindoor: "नूर खार एअरबेसवर हल्ला झाला, रात्री अडीच वाजता मुनीर यांचा...

Operation Sindoor: “नूर खार एअरबेसवर हल्ला झाला, रात्री अडीच वाजता मुनीर यांचा मला फोन”; शाहबाज शरिफ यांची कबुली

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील नागरी वस्तीत हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने हे हल्ले परतावून लावले मात्र पाकच्या नापाक कृतीला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील अनेक सैन्य तळांना टार्गेट केले. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने तणाव वाढला. या दरम्यान, दोन्ही देशांमध्ये युध्दविराम देखील झाला. आता शस्त्रविराम झाल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताच्या कारवाईवर भाष्य केले आहे. पाकिस्तानमध्ये बोलत असताना शाहबाज शरीफ म्हणाले की, ९ आणि १० मे च्या रात्री अडीच वाजता लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी हॉटलाईनवरून भारताने केलेल्या ऑपरेशनची माहिती दिली.

- Advertisement -

पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याची माहिती दिली. त्यानुसार ९ आणि १० मे रात्री जवळपास २:३० वाजता जनरल सय्यद असीम मुनीर यांनी त्यांना कॉल केला. भारतीय बॅलेस्टिक मिसाईल नूर खान एअरबेस आणि काही इतर भागावर डागण्यात आले आणि त्यात मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. एअरबेस वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मुनीर यांनी दिल्याची माहिती शरीफ यांनी दिली.

भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्या X अकाऊंटवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. शाहबाज शरीफ यांच्या भाषणातून ऑपरेशन सिंदूरची अचूकता, धाडस दिसून येते असे मालवीय म्हणाले.

भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा खोटा दावा पाकिस्तान सतत करत होते. पण भारताने नुकसानीचे छायाचित्र जगासमोर मांडली होती. यानंतर पाकिस्तान आणि मुनीर हे सातत्याने त्याचे खंडन करत होते. पण अखेर त्यांनी भारताने घुसून हल्ले केल्याचे त्यात जीवित हानी झाली आणि हवाईतळांचे मोठे नुकसान झाले.

नुर खान एअरबेस पाकिस्तानसाठी महत्वाचा
नुर खान एअर बेस पाकिस्तानसाठी महत्वाचा आहे कारण इथे पाकिस्तानातील VVIP आणि हायलेव्हल मिलिट्री एविशन सेंटर आहे. इस्लामाबादपासून जवळ असलेला हा एअरबेस पाकिस्तानातील संवेदनशील भागात येतो. आतापर्यंत हल्ल्यानंतर आलेल्या सॅटेलाईट फोटोत भारतीय सैन्याचा हल्ला अगदी अचूक होता हे दिसून आले. भारताने निश्चित केलेल्या टार्गेटवर हल्ला यशस्वी केला. इस्लामाबाद येथील नूर खान एअरबेस, पाकिस्तानी हवाई दलाला ऑपरेशन्सवेळी मदत करते. स्पेस कंपनीसह अनेक सॅटेलाईट कंपन्यांनी या एअरबेसचे हल्ला झाल्यानंतरचे फोटो प्रकाशित केले आहेत.

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक काश्मीरी नागरिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी स्थळांना लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूरद्वारे २५ मिनिटांत केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांशी संबंधित ठिकाणांना उध्वस्त करण्यात आले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १७ मे २०२५- उत्तरे शोधावीच लागतील

0
वातावरण अजूनही ढगाळ असले तरी अवकाळी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. तथापि गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या कोसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिक...