नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम भ्याड हल्ल्याची चीड भारतीयांच्या मनात गेली कित्येक दिवस घर करून होती. दोन आठवडे उलटून गेल्यानंतर कारवाई होत नसल्याने अस्वस्थता होती. पण केंद्र सरकार आणि सैन्य दल या भ्याड हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याची जोरदार तयारी करत होते. भारताने या भ्याड हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल हे आधीच स्पष्ट केले होते. पण कधी आणि केव्हा हे मात्र निश्चित नव्हते. अखेर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला.
भारताने केलेल्या या हल्ल्यात ९ दहशतवादी तळांना लक्ष केले आहे. ही कारवाई योग्य रणनितीनुसार पार पडली. या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सैन्य तळ नव्हते, पण दहशतवादी ठिकाणांवर वेचून हल्ला केला आहे. भारताने दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येतेय. हा हल्ला लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या लपण्याच्या ठिकाणांवर करण्यात आला आहे.
भारतीय वायुदलाकडून जैश ए मोहम्मद, हिजबुल मुज्जाहिद्दीन, लश्कर ए तोयबाचे तळ उद्धवस्त, मध्यरात्री दीड वाजता कारवाई, दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटरही उद्ध्वस्त करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेने या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पसचे अचूक लक्ष्य साधले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेने बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून, भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. भारताने आपल्या हद्दीत राहून हा हवाई हल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्तीगतरित्या या ऑपरेशनची मॉनिटरिंग केली. ९ टार्गेट ठेवण्यात आले होते. ९ च्या ९ टार्गेट यशस्वी झाले आहेत. त्यांना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, वरिष्ठ गोपनीय अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सतत माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पीएम मोदी सैन्य, नौदल आणि एअर फोर्स चीफ दरम्यान अनेक बैठका झाल्या.
संरक्षण मंत्रालयाने काय म्हंटले?
या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने मध्यरात्री १.४४ मिनिटांनी एक निवदेन प्रसिध्द केले. “कुठल्याही पाकिस्तानी सैन्य प्रतिष्ठानला लक्ष्य करण्यात आलेले नाही. दहशवादी कारवायांसाठी वापरले जाणारे इन्फ्रास्ट्रक्चर उद्धवस्त केले” असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
A little while ago, Indian Armed Forces launched #OperationSindoor, striking terrorist infrastructure in #Pakistan & PoJK— sites from where attacks on India were being planned.
Altogether 9 terror sites have been targeted.#IndianArmy#IndiaFightsBack #IndiaAgainstTerrorism pic.twitter.com/yChAzHO94v
— PIB in Bihar (@PIB_Patna) May 6, 2025
कोणती ठिकाणे उध्द्वस्थ केली?
मुजफ्फराबाद
कोटली
गुलपुर
बिंबर
पाकिस्तानात चार ठिकाणी टार्गेट
सियालकोट
चक अमरू
मुरीदके
बहावलपूर
Summary on the list of 9 targets taken by the Indian Armed Forces under #OperationSindoor in Pakistan, PoK
1. Markaz Subhan Allah Bahawalpur
2. Markaz Taiba, Muridke
3. Sarjal / Tehra Kalan
4. Mehmoona Joya Facility, Sialkot,
5. Markaz Ahle Hadith Barnala, Bhimber,
6. Markaz… pic.twitter.com/vycQ7LGwt5— ANI (@ANI) May 7, 2025
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा