Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारसहावी अनुसूची लागू झाल्यास देशातील आदिवासींचा खर्‍याअर्थाने विकास शक्य!

सहावी अनुसूची लागू झाल्यास देशातील आदिवासींचा खर्‍याअर्थाने विकास शक्य!

मोलगी | वार्ताहर- MOLAGI

संविधानातील (Constitution) सहावी अनुसूची लागू झाल्यास देशातील (Tribal) आदिवासींचा खर्‍या अर्थाने विकास व प्रगती होईल असे मत (State of Assam) आसाम राज्यातील (mp Nabakumar Sarania) खा.नबाकुमार सरानिया उर्फ हिरा यांनी बोलून दाखवली. त्यांनी (Satpuda) सातपुड्यातील आदिवासींच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेट दिली. या भेटीत सातपुड्यातील (Historical) ऐतिहासिक तसेच धार्मिक स्थळांची माहिती जाणून घेत दर्शनही घेतले.

- Advertisement -

आसाम राज्यातील अनुसूचित जमाती मतदार संघातून सर्वाधिक मताने निवडून आलेले खा.नबाकुमार सरानिया उर्फ हिरा हे संपूर्ण देशातील राज्यांमध्ये असलेल्या आदिवासींच्या समस्या तसेच माहिती जाणून घेण्यासाठी भ्रमंती करीत आहेत.

त्यांनी अक्कलकुवा तालुक्यात सातपुड्यातील आदिवासींच्या समस्या तसेच त्यांची सांस्कृतिक, पारंपारिक, ऐतिहासिक व धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आदिवासींचे धार्मिक वा ऐतिहासिक ठेवा असलेल्या देवगोई, डाब, काठी, भगदरी याठिकाणी भेट देऊन येथील प्रमुखांशी बैठकी घेऊन चर्चा केली.

सातपुड्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या काठी येथील संस्थानिकांची माहिती घेऊन संस्थानिकांच्या वारसांची माहिती घेत त्यांच्याकडे पाहुणचार घेत एक रात्र मुक्कामी थांबून त्यांच्या चालीरीती समजून घेतल्या. यावेळी चर्चा करताना त्यांनी सांगितले,

देशातील आदिवासींना आजही मूलभूत गरजांसाठी झगडावे लागते. देशात संविधानातील सहावी अनुसूची लागू झाल्यास आदिवासींची खर्‍याअर्थाने प्रगती व विकास होईल यावेळी बोलताना त्यांनी सांगितले,

आसाम राज्यामध्ये पेसा कायदा प्रभावीपणे राबविला जात असून या राज्याच्या विकासासाठी विकास परिषद नेमण्यात आली असून या परिषदेचे अध्यक्ष खुद्द राज्याचे राज्यपाल असल्याने आदिवासींच्या विकासासाठी या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास सुरू आहे.

मी खासदार झाल्यानंतर संपूर्ण देशातील आदिवासींच्या समस्या तसेच माहिती जाणून घेऊन संसदेमध्ये संविधानातील सहावी अनुसूची लागू करण्यासाठी आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आदिवासी एकता परिषदेचे दरबारसिंग पाडवी, भारतीय जनता पक्षाचे आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश पाडवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, किरसिंग वसावे, सिताराम राऊत, निवृत्त विक्रीकर अधिकारी भगतसिंग पाडवी, पं.स.सदस्य पिरेसिंग पाडवी, माजी पं.स.सदस्य धनसिंग वसावे, डॉ.दिलवर वसावे, ऍड. अभिजीत वसावे, बहादूरसिंग पाडवी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या