Friday, May 16, 2025
Homeधुळेअफूची तस्करी रोखली ; गुजरातच्या कारसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

अफूची तस्करी रोखली ; गुजरातच्या कारसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे – प्रतिनिधी dhule

- Advertisement -

मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) तालुक्यातील आर्वी येथे तालुका पोलिसांच्या (police) पथकाने मानवी मेंदूवर परिणाम करणार्‍या अफुची तस्करी रोखली. गुजरातमधील कारसह 18 लाखांचा अफु जप्त करण्यात आला. मात्र चालक हातून निसटला. काल सायंकाळी कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील (Superintendent of Police Praveen Kumar Patil) यांनी पत्र परिषदेत पथकाचे कौतुक केले.

आर्वी (ता.धुळे) येथे काल दि.18 रोजी दुपारी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे पेट्रोलींग करीत होते. त्या दरम्यान सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास एक महिंद्रा एक्सयुव्ही मॉडेलचे वाहन (क्र.जीजे 01 आरपी 1281) हे धुळ्याकडून मालेगावकडे जाताना दिसले.

त्याबाबत संशय आल्याने पोलिसांनी त्या वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता, चालकाने वाहन रस्त्याचे कडेला लावून गाडीतून उतरून पळू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळून आला नाही. त्यानंतर संशयीत वाहनाची तपासणी केली असता त्यात 18 प्लॉस्टीकच्या गोण्यात अफुच्या बोंडाचा तुकड्यांचा चुरा भरलेला आढळून आला. एकुण 9 लाख 93 हजार 180 रूपये किंमतीचा 331 किलो अफुच्या बोंडाचा तुकड्यांचा चुरा व 8 लाखांची कार असा एकुण 17 लाख 93 हजार 180 रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंद झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि प्रकाश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ही कामगिरी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर काळे, असई सुनिल विंचूरकर, पोहेकॉ प्रविण पाटील, किशोर खैरनार, पोकाँ नितीन दिवसे, अमोल कापसे यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राजनाथ

Rajanath Singh: ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. त्यांनी जवानांची भेट घेत त्यांचे भरभरून कौतुक केले....