Sunday, November 17, 2024
Homeमुख्य बातम्यापावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा आक्रमक पवित्रा

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा आक्रमक पवित्रा

मुंबई

विधानसभेच्या कोरोना काळातील प्रदिर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याने गाजले.

- Advertisement -

आजच्या कामकाजात दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह अन्य सदस्यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यापूर्वी सभागृहाच्या पटलावर सन २०२०-२१ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांसह काही महत्वाची विधेयके मांडण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सुधारणा विधेयक सभागृहाच्या पटलावर मांडण्यास विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. या विधेयकाबाबत आक्षेप घेताना त्यांनी या विधेयकातील काही भागावर आजच उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने आज विधेयक मांडणे न्यायालयाचा अधिक्षेप करणारे ठरेल असे सांगितले. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी न्यायप्रविष्ठ बाबीवर हे विधेयक नसून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोविड काळात घेता येत नसल्याने विशिष्ठ परिस्थितीत काय करावे याची स्पष्ट तरतूद ७३व्या घटनादुरूस्तीमध्ये नसल्याने त्याबाबत सुधारणा करण्यासाठीचे विधेयक आहे असा खुलासा करण्याचा प्रयत्न केला.

आज केवळ हे विधेयक पटलावर ठेवले जात आहे ते मंजूर चर्चा झाल्यावर उद्या केले जाईल त्यामुळे आक्षेपार्ह काही नाही असे विधानकार्यमंत्री अनिलपरब म्हणाले. मात्र फडणवीस यांनी मुद्दा लावून धरला ते म्हणाले की अमचा विरोध विधेयकाला नाहीच त्याची मांडायची घाई का केली जात आहे. सरकारने न्याय निर्णयाला आधीन राहून दुरूस्ती अंमलांत आणायची हमी द्यावी असे ते म्हणाले.

या मुद्यावर जयंत पाटील, अजीत पवार, छगन भुजबळ आदी ज्येष्ठ सदस्यांनी विरोधकांचा आक्षेप अयोग्य असल्याचे सांगितले. त्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यानी या मुद्यावर निर्णय देताना विधेयक मांडण्यास अनुमती दिली. त्यावेळी काही काळ विरोधकांनी सदनात घोषणा दिल्या. नंतर अन्य कामकाज सुरू करण्यात आले मात्र काही वेळाने पुन्हा फडणवीस यांनी न्यायालयातील ताज्या घडामोडींचा संदर्भ देत येथे जो न्याय मिळाला नाही तो न्यायालयाने नुकताच दिल्याचे सांगत प्रशासक म्हणून न्यायालयाने ठरवून दिलेल्या चार लोकसेवकांशिवाय अन्य कुणाला योग्य व्यक्ती म्हणून नेमता येत नाही असे सांगितल्याचे सांगितले. आणि आम्हाला न्याय मिळाला असे ते म्हणाले.

त्यावर जयंत पाटील यांनी असे काही नसल्याचे सांगत न्यायालयाचा निर्णय सर्वाना बंधनकारक आहे असे सांगितले मात्र विरोधकांनी या मुद्यावर आज आक्रमक पवित्रा घेतल्याने सदनात काहीकाळ तणावाचे वातावरण होते.

कामकाजाचे मुद्दे पटलावर मांडल्यावर शोकप्रस्ताव घेण्यात आला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी भारत रत्न माजी राष्ट्रपती प्रणवदा यांच्या बाबत गौरवोदगार काढले. त्यांच्या दोनवेळा झालेल्या भेटीबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, सामान्य माणूस ते राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास करताना ते अजात शत्रू राहिले हे त्याचे वैशिष्टे होते असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या