Monday, March 17, 2025
Homeदेश विदेशINDIA vs NDA : 'इंडियाच्या' बैठकीतून उध्दव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा ;...

INDIA vs NDA : ‘इंडियाच्या’ बैठकीतून उध्दव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा ; म्हणाले, आम्ही आहोत..

बंगळुरु | Banglore

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारविरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. आज ( १८ जुलै ) विरोधकांची दुसरी बैठक (Opposition Party Meeting) बंगळुरु येथे पार पडली. या बैठकीत महाआघाडीचे नाव ‘इंडिया’ (INDIA) असे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात ‘इंडिया’ विरुद्ध ‘एनडीए’ (INDIA vs NDA) अशी लढाई पाहायला मिळणार आहे. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच विरोधकांची तिसरी बैठक मुंबईत होईल, अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरून केली आहे.

- Advertisement -

या पत्रकार परिषदेवेळी, उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, देशाला वाचवण्यासाठी हा लढा आहे. वेगवेगळ्या विचारांचे पक्ष असलो तरी एकत्र आलो आहोत. वेगवेगळे विचार असणे हीच लोकशाही आहे. आमचे वेगळे विचार असले तरी एक आलो आहोत. त्याला काही कारणे आहेत. काहींना वाटते की आम्ही आमचा पक्ष, कुटुंब वाचवायला आलो आहोत. हा देश आमच्यासाठी कुटुंब आहे..आम्ही देश वाचवायला आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

UPA नाही तर आता INDIA… विरोधी ऐक्याचे नाव ठरले; काय आहे फुल फॉर्म?

यासोबत ते पुढे असे ही म्हणाले, देशातील स्वातंत्र्य धोक्यात आल्याने आम्ही लढत आहत. ही लढाई एखादा पक्ष किंवा व्यक्तीविरोधात नाही तर निती आणि हुकूमशाहीविरोधात आहे. एक व्यक्ती किंवा एक पक्ष हा देश होऊ शकत नाही. या लढाईत आम्ही नक्की यशस्वी होऊ, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. सध्याच्या वातावरणामुळे देशातील जनता घाबरली आहे. मात्र, मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की, ‘तुम्ही घाबरु नका, आम्ही आहोत’, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले

विरोधकांच्या बैठकीवर PM मोदींचा हल्लाबोल; म्हणाले…

दरम्यान, या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचे ही जाहीर केले आहे. या बैठकीची तारीख पुढील काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. ही लढाई नरेंद्र मोदी आणि इंडियात आहे, दोन विचारधारांमध्ये आहे. INDIA समोर कोणीही उभा ठाकतो, तेव्हा त्यांचं काय होते, हे सगळ्यांना माहिती आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. पुढील बैठकीत समन्वय समितीची बैठक होणार आहे. या समितीत ११ सदस्य असणार आहेत. त्यातील नावांबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

औरंगजेबाच्या कबरीबाबत जनभावनेचा आदर करावा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे पाडली. हिंदू संस्कृती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला. त्यामुळे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त...