Wednesday, April 30, 2025
Homeनगरस्त्रियांवर अत्याचार करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा करा

स्त्रियांवर अत्याचार करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा करा

सोनई क्रांती महिला मंडळाचे पोलीस अधिकार्‍यांना निवेदन

सोनई (वार्ताहर)- महाराष्ट्रातील विविध ठिकाणी झालेल्या स्त्री अत्याचाराच्या घटनांचा सोनई येथील क्रांती महिला मंडळाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला असून याबाबत सोनई पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

जळगाव जामोद (बुलढाणा), खेरडा अविवाहित दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या तसेच नागपूर कमळेश्वर येथील 5 वर्षीय चिमुकलीवरचे अत्याचार इत्यादी घटनांचा सोनईच्या क्रांती महिला मंडळाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. मंडळाच्या सदस्य महिलांनी याबाबतचे निवेदन सोनई पोलीस ठाण्यामार्फत शासनाला पाठविले. निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रात महिलेवर अत्याचार करून हत्या करण्याच्या या घटनांचा आम्ही तीव्र निषेध करीत असून या घटनांमधील आरोपींनी मद्यसेवन करून क्रूर अत्याचार केले. महिलांना शारीरिक इजा झाल्याने निष्पाप महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अशा घटनांमध्ये आरोपींना तात्काळ जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा ठोठवण्याची मागणी या निषेधपत्रात करण्यात आली आहे.

सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्याकडे निवेदन सुपूर्त करण्यात आले. क्रांती महिला मंडळाच्या श्रीमती द्वारका कुमावत, शकुंतला सांगळे, शशिकला काळे, पूजा लोणारे, संगीता पाडळे, इरफाना, रझिया, उषा जाधव आदी महिलांच्या सहीने हे निवेदन देण्यात आले.

‘स्नेहालय’च्या सामुदायिक विवाहात कन्यादान
अहमदनगर येथील स्नेहालयमध्ये 15 डिसेंबरला दहा जोडप्यांचे सामुदायिक विवाह होणार असल्याची माहिती मिळाल्याने आमच्या सोनई क्रांती मंडळाच्या महिला त्या वधूवरांना कन्यादान, संसारोपयोगी साहित्य देणार असून उपक्रमाचे स्वागत करणार आहोत.
द्वारकाताई बाबुलाल कुमावत, सदस्या, सोनई क्रांती महिला मंडळ

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मोठा निर्णय : केंद्र सरकार देशभरात जातनिहाय जनगणना करणार

0
दिल्ली । वृत्तसंस्था Delhi केंद्रातील मंत्रिमंडळाने जातीय जनगणनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी सातत्याने गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून...