Thursday, September 12, 2024
Homeधुळेजिल्ह्यात जमावबंदी आदेश

जिल्ह्यात जमावबंदी आदेश

धुळे । प्रतिनिधी dhule

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी नितीन गावंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 15 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

- Advertisement -

सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणार्‍या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या