Friday, April 25, 2025
Homeनाशिकनाशकात राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन

नाशकात राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्राची सहकार परंपरा विकासात्मक असून तळागाळातील जनतेला आर्थिक सबलीकरणाचा तो मूलभूत आधार आहे त्यासाठी आजच्या आधुनिक युगात सहकार तळागाळात नेण्यासाठी प्रबोधनात्मक जाणीव गतिमान करण्यासाठी नाशिक येथे डिसेंबर २०२३ मध्ये होणारी राज्यस्तरीय सहकार परिषद ही आर्थिक विकासाचे मॉडेल म्हणून सर्वांसमोर येईल.

- Advertisement -

या परिषदेच्या माध्यमातून सहकार बँकिंग क्षेत्रातील आधुनिक बदल, डीजिटलायझेशन, तंत्रज्ञान,भविष्यातील आव्हाने यांची चर्चा होण्याबरोबरच सहकारातील भविष्याचे लक्ष काय यावर विचारमंथन होईल ते भारताच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारे ठरेल.

त्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने सहकार परिषद यशस्वी करू असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्य मंत्री तथा नाशिक येथे डिसेंबर2023 संपन्न होणार्‍या सहकार परिषदेच्या स्वागताध्यक्ष .डॉ. भारती पवार यांनी केले.

दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन, नाशिकतर्फे नाशिक येथे डिसेंबर 2023 मध्ये संपन्न होणार्‍या सहकार परिषदेच्या लोगोचे अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

प्रास्ताविक सहकार परिषदेचे निमंत्रक विश्वास ठाकूर यांनी केले. सहकार परिषदेच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण , .डॉ. भागवत कराड ,रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संचालक सतीश मराठे, नॅफकब अध्यक्ष ज्योतींद्र मेहता , सहकार मंत्री अतुल सावे यांना निमंत्रित करणार आहोत.

समारोप समारंभाला प्रमुख अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुरेश प्रभू, आमदार छगनराव भुजबळ, अनिल कवडे-सहकार आयुक्त हे असतील.

नियोजनात पालकमंत्री दादा भुसे, आ. देवयानी फरांदे,सीमाताई हिरे,राहुल ढिकले, राहुल आहेर यांचे सहकार्य आहे. सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे , महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई चे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नाशिकचे फैय्याज मुलानी,राजेंद्र सूर्यवंशी,नानासाहेब सोनवणे प्रयत्नशील आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...