नाशिक । प्रतिनिधी Nashik
पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट व नाशिकरोड येथील भंडारी ज्वेलर्स प्रस्तुत ‘समर धमाका’ या गृहउपयोगी साहित्यांच्या प्रदर्शनाचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले आहे. काशी माळी मंगल कार्यालय ग्रीन स्क्वेअर बँक्वेट हॉल अँड लॉन्स ट्रॅक्टर सेंटरच्या मागे तिग्रानिया रोड द्वारका या ठिकाणी प्रदर्शन भरणार आहे. यात खवय्यांसाठी खाद्य पदार्थांचे विशेष आकर्षण आहे. नवनवीन खाद्यपदार्थ स्टॉल्स, यासोबतच कपडे, ज्वेलरी, आईस्क्रीम ,ज्यूस सरबत, आईस गोला, वाळवण आणि गृह उपयोगी साहित्य प्रदर्शनात असणार आहे. दि. १ ते ३ मार्च 2025 दरम्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांची या प्रदर्शनाला मुख्य उपस्थिती असणार आहे. या ठिकाणी लकी ड्रॉ कुपनही ठेवण्यात आले असून, या प्रदर्शनासाठी मोफत प्रवेश असणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 या प्रदर्शनाची वेळ आहे. यासोबतच क्युटिस्ट बेबी कॉन्टेस्टचेही आयोजन करण्यात आले आहे. 2 मार्चला सायंकाळी सहा वाजता होम मिनिस्टर विथ भूषण कापडणे यांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष मीनल कुलकर्णी या आहेत.