Monday, May 20, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन

जिल्ह्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रानभाज्यांचे आहारातील महत्व आणि दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश व्हावा यासाठी कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्या वतीने जिल्ह्यात 14 व 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे…

- Advertisement -

मानवी आरोग्यामध्ये सकस आहाराचे महत्व अनन्य साधारण आहे. जंगलात तसेच शेतशिवारात नैसर्गिकरित्या उगविल्या जाणाऱ्या रान पालेभाज्या, फळभाज्या, कंद, शेंगा यात शरीरास आवश्यक असणारे औषधी व पौष्टीक घटक विपूल प्रमाणात आढळतात. या रानभाज्यांचा हंगाम पावसाळ्याच्या सुरवातीपासून ऑक्टोबरपर्यंत चालतो.

Tribal Day 2023 : नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा, पाहा व्हिडीओ…

यात करवंदे, गुळवेल, कडूकंद, चाईचा मोहर आणि सुरण, तांदुळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोरला, कुर्डू, घोळ, अळू, खुरसणी, तोडली व लोथ यांचा समावेश होतो. रानभाज्यांची उगवण नैसर्गिकरित्या होत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशके, बुरशीनाशके यांची फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे रानभाज्यांचे महत्व सर्वसामान्यापर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवाची व्याप्ती वाढविणे काळाची गरज असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Monsoon Session : “राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिला”; स्मृती इराणींचा गंभीर आरोप

जास्तीत जास्त नागरिकांनी महोत्सवास भेट देवून आरोग्यवर्धक रानभाज्या खरेदी कराव्यात. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे व आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले आहे.

रानभाजी महोत्सवामुळे रानभाज्यांना चांगला बाजार मिळेल, शेतकऱ्यांना अशा भाज्यांचे योग्य भाव मिळतील व शहरी ग्राहकांना रानभाज्यांची ओळख होईल या दृष्टीकोनातून रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

बाबरीप्रकरणी शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या