मुंबई | Mumbai
यंदाचा ऑस्कर सोहळा भारतासाठी खुप खास ठरला. ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक एस.एस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Naatu Naatu) या गाण्यानं बेस्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमधील पुरस्कार पटकावला आहे.
तर सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म या कॅटेगिरीमधील ऑस्कर पुरस्कार हा भारताच्या ‘द एलिफंट विस्परर्स’ (The Elephant Whisperers) या डॉक्युमेंट्रीनं पटकावला. ‘नाटू नाटू’ आणि ‘द एलिफेंट विस्पर्स’ याला पुरस्कार मिळाल्यानंतर फक्त नेटकरीच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आरआरआर चित्रपटाच्या टीमचं कौतुक करत नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘नाटू नाटू’ची लोकप्रियता जागतिक आहे. पुढील अनेक वर्षे स्मरणात राहिल, असं हे गाणं आहे. एम एम किरावाणी, चंद्रबोस आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. भारताला आनंद होत आहे आणि अभिमान वाटत आहे.’
तर दुसऱ्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदींनी ‘द एलिफंट विस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीच्या टीमचं अभिनंदन केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘द एलिफंट विस्परर्स’ च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे महत्त्व अधोरेखित केले.’
दुसरीकडे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष यांनी RRR च्या टीमला शुभेच्छा देत म्हटले की ‘भारताचं हे गाणं आणि डान्स खरंच ग्लोबली व्हायरल झाला आहे. खूप शुभेच्छा आणि RRR च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा!’
राहुल गांधी यांनी ‘द एलिफेंट विस्पर्स’ या चित्रपटाविषयी कमेंट करत ‘कार्तिकी गोन्सालव्हीस आणि गुणीत मोंगा आणि ‘द एलिफेंट विस्पर्स’ च्या संपूर्ण टीमला ऑस्कर पुरस्कार मिळाल्या बाबतमीत खूप खूप शुभेच्छा! या दोन महिलांनी इतक्या सुंदर पद्धतीनं जंगल आणि जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचे महत्त्व दाखवतं भारताची मान उंचावली.’