जानोरी | वार्ताहर
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील आखरपाट वस्तीवरील शेतात शहामृग पक्षी आढळून आला. यानंतर या पक्ष्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे आज (दि. ७) रोजी दुपारच्या सुमारास वस्तीवरील एका शेतात शहामृग पक्षी आढळून आला.
शेजारीच संजय काठे, रामदास डोळे, गोपाळ उंबरसाडे, माधव उंबरसाडे, आनंद शेवरे हे युवक होते. पक्ष्याला बघताच येथील नागरिकांनी त्यास पकडले.
पोलिस पाटील सुरेश घुमरे व उपसरपंच गणेश तिडके यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाशी संपर्क साधून सदर पक्षी बद्दल माहिती दिली.
यावेळी वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. युवकांशी चर्चा करून शहामृग पक्ष्याला त्यांनी ताब्यात घेतले. पक्षास दवाखान्यात नेऊन तपासणी करण्यात आली.
यावेळी वनमजुर शांताराम शिरसाठ, वैभव गायकवाड, चेतन गवळी, उपसरपंच गणेश तिडके ,संजय काठे, रामदास डोळे, गोपाळ उंबरसाडे, माधव उंबरसाडे, आनंद शेवरे आदी उपस्थित होते.