Saturday, January 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकाही लोकांचे ध्येय तिजोरी तर आमचे ध्येय विकासाचे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

काही लोकांचे ध्येय तिजोरी तर आमचे ध्येय विकासाचे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पर्यावरणाचा समतोल साधूनच कुंभमेळा होणार

नाशिक |

नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, आणि रिपब्लिकन सेना या पक्षांच्या महानगरपालिकेतील निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा.सुनील तटकरे यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर भव्य सभा आज पार पडली. दरम्यान निवणुकी आल्या की काही लोकांना विकासात इंटरेस्ट नाही, तिजोरीत इंटरेस्ट असतो तर , नाशिक मध्ये आमचे ध्येय विकासाचे आहे. आमचे तिजोरीवर लक्ष नसून नाशिकचा विकास आम्हाला करायचा आहे. एवढी गर्दी पाहून विरोधकांच्या पोटात नक्की गोळा आला असेल. ही तर प्रचाराची सभा नसून विजयाची सभा आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

भाषणाच्या सुरवातीसच लाडक्या बहिणींचा उल्लेख करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ‘ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला हे गणित विधान सभेच्या निवडणुकीपासून दृढ झाली आहे.नगर परिषदेच्या निवडणुकीत देखील हीच स्थिती पाहण्यास मिळाली. शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढत आहेबिनविरोध निवडणून आले म्हणून काही जण चिंता करत आहेत , अहो त्यांच्या उमेदवाराने माघार घेतली त्यांचा विचार असे ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

YouTube video player

तीन वर्षात ४५० कोटी नाशिकच्या विकासासाठी दिले सिंहस्थ कुंभमेळ्या साठी मोठा निधी दिला आहे. कुंभमेळा देखील ऐतिहासिक होईल भाविकांना, साधू संताना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. सर्व नाशिक करांची इच्छा तपोवन वाचवा अशी असून , पर्यावरणाचा समतोल साधूनच कुंभमेळा होणार आहे.असल्याचे त्यांनी सांगितले.

गोदावरी नदीच्या परिसरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. नाशकातील धामिक आणि पर्यटन स्थळांचा देखील विकास आम्ही करणार आहोत. मुंबई, ठाणे प्रमाणे ५०० स्क्वेर फुटा पर्यंत घरपट्टी माफ करू , पुनर्विकासात ९ मीटर उंचीच्या रस्त्यावर इमारतींची उंची ३० मीटर पर्यंत करण्याचे प्रयत्न करणार आहोत , सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याचा निर्णय घेऊ, सेन्ट्रल पार्क फेज २ साठी निधी देण्याचे काम करू , द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यावर काम करणार आहे, गोदावरी नदीच्या पूर रेषेचे पुनर सर्वेक्षण करून विस्थापित झालेल्या लोकांना पुनर्वसन करू; कालिदास नाट्य गृह , सायखेडकर नाट्य गृहाचे प्रलंबित प्र्शानंबाबत निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगतिले आहे.

पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देईलप्रदेशाध्यक्ष खा. तटकरे

   अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिक शहर व जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे या शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. आता यापुढील काळात विकासाच्या दृष्टीने एकत्र आलेली शिवसेना राष्ट्रवादीची युती नाशिक शहराच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केले.

  खासदार तटकरे म्हणाले की, नाशिक कृषि उत्पादनात अग्रेसर असा जिल्हा आहे. नाशिक शहर व जिल्ह्याने औद्योगिक क्षेत्रात देखील आता आघाडी घेतली आहे. यामध्ये मंत्री भुजबळ यांचे योगदान अतिशय म्हत्वाचे याSऊन त्यांनी नाशिक शहर आणि जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे मोठे जाळे निर्माण केले. मुंबई नाशिक रस्त्यासह अनेक महत्वपूर्ण विकासाची कामे केली आहे. त्याचदृष्टीने नाशिकच्या विकासासाठी शिवसेना राष्ट्रवादी युती केली असून नाशिकच्या अधिक पायाभूत सुविधांचा विकास यापुढील काळात आपण करणार आहोत.

या सभेस नाशिककरांची उपस्थिती ही शिवसेना राष्ट्रवादीच्या विजय निश्चित केला आहे. आगामी काळात नाशिक महानगरपालिकेत शिवसेना राष्ट्रवादी युतीची सत्ता आल्यानंतर या शहराच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याचे काम केले जाईल. युतीचे सर्व नगरसेवक हे सेवाभाव वृत्तीने या शहराची सेवा करतील, असा विश्वास व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Accident News : डंपरच्या धडकेत एकजण ठार

0
नेवासा फाटा |वार्ताहर| Newsa नेवासा-शेवगाव राज्यमार्गावरील (Newasa Shevgav Highway) भानसहिवरा शिवारात असलेल्या एका दूध डेअरीजवळ शनिवार दि.10 रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास भरधाव डंपरने (Dumper...