Saturday, November 2, 2024
Homeशब्दगंधसिमला व सरहान

सिमला व सरहान

अंजली राजाध्यी

आमचा पहिला थांबा सिमल्याला होता. तत्पूर्वी खुफ्रीला पोहोचलो. तेथील बर्फातील खेळ व साहसी खेळ खेळण्याइतका वेळ हाताशी नसल्याने सरहनमार्गे जात राहिलो. वाटेत भरपूर घनदाट जंगले, सफरचंदांच्या बागा दिसल्या. सफरचंदाची फुलेही बघितली, नीलमोहर जागोजाग बहरले होते. गुलाब फुलले होते. जसजसे वर जात होतो हवेच्या दाबाचा फरक जाणवत होता व कानात कापूस व नाकाशी कापूर असे हाताशी होतेच. सरहानला पोहोचल्यावर गरम चहाने स्वागत झाले. तेथील मालकीणबाई लीला खेमता यांनी वैयक्तिक सेवा दिली. हिमाचलमध्ये विवाहित स्त्रिया डोक्यावर विशिष्ट पद्धतीने रुमाल बांधतात हे तेथील अनेक दुकानांत पाहिले.

- Advertisement -

सरहानला भीमाकाली मंदिर पाहिले. त्या देवळाचे बांधकाम लाकूड कोरून विशिष्ट पद्धतीने केले आहे. देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी हे एक व जुन्या भारत-तिबेट रस्त्यावर किन्नौर प्रदेशाचे महाद्वार. बुशाहर किंगडमचा राजा वीरभद्र सिंग, जे आज हिमाचलचे मुख्यमंत्री आहेत, ते राजा पद्मसिंग यांचे आजचे वंशज. मंदिराच्या बाजूलाच त्यांचा राजवाडा पाहिला; परंतु उशीर झाला असल्याने बाहेरील बाग व बंद लाकडी महाल पाहून आलो.

सरहान हे बुशाहर राजवटीचे ओळखले जाते. का? ते तेथेच समजते. कारण ज्या सरहानमध्ये एरवी थंडीत अगदी खालच्या रस्त्यांपर्यंत बर्फवृष्टी होते ते ऐन उन्हाळ्यात आम्हाला उबदार भासले. जुन्या पुण्यासारखे.

आमच्या खिडकीतून बर्फाच्छादित शिखरे दिसत होती परंतु मालकीणबाईंनी आम्हाला गच्ची उघडून दिली होती व गच्चीत पहाट फटफटताना लवकर साडेपाच वाजताच उजाडते व 360 ओ मध्ये हिमशिखरांचा जो नजारा दिसतो, त्यासाठी हाताशी एक चांगला कॅमेरा हवा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या