Wednesday, September 11, 2024
Homeनाशिकयंदा ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव

यंदा ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यात ऊसावरील तपकिरी ठिपके व तांबेरा रोगाने ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आला असून या रोगाने ऊस उत्पादकांची चिंता वाढवली आहे.

- Advertisement -

सतत पडणारा पाऊस ढगाळ वातावरण व हवेतील आद्रतेचे वाढलेले प्रमाणयामुळे यामुळे यंदा ऊस पिकावर तांबेरा रोगासह मिलीबगचेही प्रमाण वाढतांना दिसून येत आहे.

तांबेरा रोगामुळे बुरशीचा प्रादुर्भाव पानाच्या दोन्ही बाजूंना होऊन पानावर लहान लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढून त्यांचा रंग लालसर तपकिरी होतोटिपक्यांच्या भोवती फिक्कट पिवळसर हिरवी कडा तयार होऊन पानाच्या खालच्या बाजूस ठिपक्यांच्या जागेवर उंचवटे तयार होतात.

ठिपके फुटून नारंगी किंवा तांबुस तपकिरी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात.

हवेद्वारे रोगाच्या बीजानूचा प्रसार होतो पानावरील ठिपक्यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकात मिसळून मोठे ठिपके तयार होतात या रोगग्रस्त टिपक्या तील पेशी मरून जाऊन पाने करपलेले दिसून येतात.

तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रकाश संश्लेषण क्रियांमध्ये अडथळा येऊन अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते परिणामी ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात घट दिसून येते.

दिंडोरी तालुक्यात आत्तापर्यंत ऊस शेतीकडे कधीच गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे उसाच्या शेतीमध्ये अनेक नवनवीन समस्या निर्माण झाले आहे परंतु आता उस शेती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची ऊस उत्पादकांना समोर आली आहे.

त्याचप्रमाणे मागील काही दिवसात तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी ऊस आडवे पडले असून या वादळी पावसामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कादवा सहकारी कारखान्याने चालू वर्षी तांबेरा रोगामुळे पिवळे पडलेले व वादळी पाऊसाने जे उस आडवे पडले आहे आशा ऊसाची तोडणी पहिल्यादां करावी म्हणजे आमच्या ऊसाचे जास्त नुकसान होणार नाही.

– माधवराव मोरे, ऊस उत्पादक करंजवण

- Advertisment -

ताज्या बातम्या