Wednesday, February 4, 2026
HomeनगरGodavari River : गोदावरीतून जायकवाडीला ४० टीएमसी पाणी

Godavari River : गोदावरीतून जायकवाडीला ४० टीएमसी पाणी

राहाता (तालुका प्रतिनिधी)

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतून काल सकाळी ६ वाजेपर्यंत ४० टीएमसी हुन अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. १ जूनपासून हा विसर्ग करण्यात आला. जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा ९० टक्क्यांच्या पुढे सरकल्याने या धरणाचे १८ दरवाज्यातून ९४३२ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपासून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. असे असले तरी नाशिकच्या १२ धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. काल सायंकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार दारणा धरणातून २४८६ क्युसेस, वालदेवीतून २४१ क्युसेस, आळंदीतून ४४६ क्युसेस, भावलीतून २०८ क्युसेस, भाम मधून १०५७ क्युसेस, वाकीतून १८४ क्युसेस, कडवातून २०५२ क्युसेस, वाघाड मधून ९७२ क्युसेस, गंगापूर मधून ६५९ क्युसेस, मुकणेतून ३०० क्युसेक, पालखेड मधून ७३८ क्युसेस, कश्यपीतून ४८० क्युसेस विसर्ग करण्यात येत आहे. तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत ४७६९ क्युसेस विसर्ग करण्यात येत होता.

YouTube video player

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत आतापर्यंत ४०.७टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर या बंधाऱ्याच्या दिशेने दारणातून १४ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गंगापूर धरणातुन ५.६ टीएमसी, कडवातुन २.४ टीएमसी, मुकणेतून १०० दलघफू, भोजापूर मधून २५४ दलघफू, आळंदीतून ६१५ दलघफू, वालदेवीतुन ६७३ दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला. फिडर डॅम असलेल्या वाकी प्रकल्पातुन ८७१ दलघफू, भाम मधुन ३.५ क्युसेस टीएमसी, भावलीतून १.२ टीएमसी, गौतमी गोदावरीतुन १५३ दलघफू, कश्यपीतुन १६१ दलघफू असा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नाशिक च्या सर्व धरणांत काल पर्यंत ८८.६२ टक्के पाणी साठा आहे. मागील वर्षी कालच्या तारखेला तो ५३.१७ टक्के इतका होता.

धरणातील पाणी साठे

नाशिक जिल्ह्यातील भाम, भावली, वालदेवी, कश्यपी, आळंदी, वाघाड, हरणभारी, केळझर ही धरणं १०० टक्के भरली आहेत. तर दारणा ८६.७५ टक्के, मुकणे ९५.१८ टक्के, वाकी ८६.४० टक्के, गंगापूर ७९.८९ टक्के, गौतमी गोदावरी ९९.७९ टक्के, कडवा ९१.४१ टक्के, भोजापूर ९८.३४ टक्के, पालखेड ६४.९३ टक्के, करंजवण ७९.२८ टक्के असे साठे आहेत. गोदावरीचे दोन्ही कालव्यांसह वैजापूर गंगापूर च्या दिशेने वाहाणारा जलद कालवा ही वाहता आहे.

जायकवाडीतुन विसर्ग

गुरुवारी दुपारी जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा ९१.४७ टक्के झाल्याने या धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलण्यात आले आहेत. त्यातुन ९४३२ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. अजुन पावसाळा बाकी असल्याने नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून विसर्ग सुरु राहु शकतो. त्यामुळे जायकवाडी प्रशासनाने विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. जायकवाडी धरणात १ जून रोजी २९ टक्के उपयुक्तसाठा होता. पावसाचा जोर मध्यंतरी वाढल्याने हा साठा ९१.४७ टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच धरणात उर्ध्व धरणातुन १५ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...