Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसला मोठा झटका! गुलाम नबी आझादांच्या पाठोपाठ ५० बड्या नेत्यांचा राजीनामा

काँग्रेसला मोठा झटका! गुलाम नबी आझादांच्या पाठोपाठ ५० बड्या नेत्यांचा राजीनामा

मुंबई | Mumbai

गुलाब नबी आझाद (ghulam nabi azad) यांनी कॉंग्रेसला (congress) राम राम केल्या नंतर कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत.

- Advertisement -

गुलाब नबी आझाद आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर आता त्यांच्या समर्थक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. जम्मू-काश्मीरमधील ५० नेत्यांनी एकाचवेळी मंगळवारी राजीनामा दिला आहे.

काँग्रेसचा (Congress) राजीनामा देणाऱ्या ५० नेत्यांमध्ये जम्मू-काश्मीरचे (Jammu-Kashmir) माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, मनोहर लाल शर्मा यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश आहे. हे सर्व नेते येत्या रविवारी आझाद यांच्या नेतृत्वाखाली नवीन पक्षात प्रवेश करणार आहेत.

दरम्यानअनेक बड्या नेत्यांच्या राजीनाम्यावर गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया आली आहे. आझाद म्हणाले, सर्वांनी माझ्यासाठी राजीनामा दिला आहे. सर्वजण माझ्यासोबत आहेत. काँग्रेसला भविष्यात आणखी अनेक धक्के बसतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या