Saturday, May 4, 2024
Homeनाशिकजखमी घुबडाला जीवदान; मिळतेय चिकनची मेजवाणी

जखमी घुबडाला जीवदान; मिळतेय चिकनची मेजवाणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मखमलाबाद रोडवर (Makhmalabad Road) रात्री जखमी अवस्थेत पडलेल्या घुबडाला जीवनदान (Owl life saved by citizens) मिळाले आहे. या घुबडाची प्रकृती स्थिर असून दोन-तीन दिवसांनंतर त्यास मूळ अधिवासात सोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे….

- Advertisement -

मखमलाबाद राऊ हॉटेल लिंकरोड (Makhamalabad rou hotel link road) परिसरातील कंसरा माता चौकात काल (दि १४) रात्री साडेदहाच्या सुमारास काही कुटुंबीय शतपावलीसाठी निघाले होते, याच वेळी त्यांच्या समोरच एक घुबड आकाशातून रस्त्यावर कोसळले. घटनास्थळी समुपदेशक ज्योत्स्ना ढगळे(Counselor jyotsna dhagale) ह्यादेखील होत्या. त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने वाहनांना सावध करत पक्ष्याला रस्त्याच्या कडेला उचलले.

काही वेळातच याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली. यावेळी ज्योत्स्ना ढगळे यांनी पक्षीमित्रांना (contact to bird friends) संपर्क केला. याचवेळी विशाल आहेर नामक एक शेतकरी याठिकाणी आले. त्यांनी या घुबडाला पकडले यावेळी आहेर यांच्या हाताला घुबडाने चोचदेखील मारली.

याचवेळी साई आनंद प्लाझा येथून ढगळे यांचे पती अॅड. अर्जुन वानखेडे (Adv Arjun Wankhede) यांनी त्यांच्या घरातून बाॅक्स आणून दिला. त्यानंतर आहेर यांनी घुबडाला बाॅक्स मध्ये ठेवून बाॅक्स दोरीने बांधून गाडीत ठेवले. ते त्याला दवाखान्यात लगेच घेऊन गेले व त्यांच्या वर उपचार केले.

दरम्यान, आहेर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की, घुबडाच्या पंखांना इजा झाली आहे. दोन-तीन दिवस त्याला इथेच ठेवत असून चांगला आहार त्यास देत आहे. जखम भरली की घुबड उडायला लागेल. यानंतर मूळ अधिवासात सोडले जाणार आहे. प्रसंगावधान राखत ज्योत्स्ना ढगळे आणि कुटुंबीयांनी घुबडाचे प्राण वाचवल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या