Sunday, November 17, 2024
Homeमुख्य बातम्याGDP वरून पी. चिदंबरम यांनी साधला सरकारवर निशाना, म्हणाले...

GDP वरून पी. चिदंबरम यांनी साधला सरकारवर निशाना, म्हणाले…

दिल्ली | Delhi

करोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल ते जून या काळात देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. याचा फटका देशाच्या GDP ला बसला. राष्ट्रीय सांख्यिकी विभागातर्फे काल देण्यात आलेल्या माहिती नुसार चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा GDP -२३.९ टक्के असल्याचं स्पष्ट झाले. यावरून माजी अर्थमंत्री व राज्यसभा खासदार पी. चिदंबरम(P. Chidambaram) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीशी बोलताना चिदंबरम म्हणाले, “ GDP चा दर उणे झाल्याबद्दल आश्चर्याचा धक्का वगैरे बसलेला नाही. आम्ही सरकारला हाच इशारा देत होतो. जगभरातल्या अर्थतज्ज्ञांनी भारत सरकारला हेच सूचित केलं होतं. तीन दिवसांपूर्वी सादर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या अहवालातही हीच गोष्ट अधोरेखित झाली होती. पंतप्रधान आणि अर्थमंत्री सोडले तर देशातल्या प्रत्येकाला, करोनामुळे अर्थव्यवस्थेला धक्का बसणार हे कळत होतं. एक देश म्हणून आपण मोठी किंमत चुकवत आहोत. गरीब, वंचित यांची अवस्था हलाखीची आहे. मोदी सरकार यापासून अबाधित आणि असंवेदनशील आहे. सरकारने जनतेसमोर खोटी मांडणी करण्याचा प्रयत्न केला मात्र जीडीपीच्या आकड्यांनी हा खोटेपणा उघड केला.” अशी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या