Tuesday, March 25, 2025
Homeनगरशेतकर्‍याची गळ्याला दोरी बांधून विहिरीत आत्महत्या

शेतकर्‍याची गळ्याला दोरी बांधून विहिरीत आत्महत्या

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

दोन्ही हाताला तसेच गळ्याला दोरी बांधून 80 फूट विहिरीतील (Well) पाण्यात एका शेतकर्‍याने आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची घटना पाचेगाव (ता. नेवासा) शिवारात शनिवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. संतराम उर्फ संजय उमाजी मतकर (अंदाजे वय 45) रा. पाचेगाव असे विहिरीत आत्महत्या (Well Suicide) केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. पाचेगाव-गुजरवाडी या रस्त्यावर शेतात घर करून राहत होता. घटना सकाळच्या वेळेस घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या घटनेची माहिती पाचेगाव (Pachegav), पुनतगाव येथील पोलीस पाटील संजय वाकचौरे यांनी पाचेगाव येथील बीट हवालदार यांना फोनद्वारे कळविण्यात आली.

- Advertisement -

या विहिरी पासून चारशे ते साडेचारशे फुटाच्या अंतरावर संतराम मतकर याचे घर आहे. आत्महत्या (Suicide) करण्याचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी दोन वेगवेगळ्या चिठ्या मिळून आल्या होत्या. नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. चिठ्यांचा उलगडा झाल्यानंतरच गुन्हा दाखल होणार आहे. नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...